मांद्रे परिसरात वीजपुरवठा होणार खंडीत

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 13 जानेवारी 2021

कोरगांव ग्रामपंचायत भागात,भाईडवाडा, गांवकरवाडा, पेठेचावाडा आणि सभोवतालच्या भागात आणि मांद्रे ग्रामपंचायत भागात,आस्कावाडा,नाईकवाडा आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

पणजी: ११ केव्ही मांद्रे फिडरवर दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १४ आणि १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत.कोरगांव ग्रामपंचायत भागात, भाईडवाडा, गांवकरवाडा, पेठेचावाडा आणि सभोवतालच्या भागात आणि मांद्रे ग्रामपंचायत भागात, आस्कावाडा, नाईकवाडा आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे ११ केव्ही आगोंद फिडरवर दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत काजूमळ, सोलये, वागोण, घाणे, माटवेमळ, पर्येकट्टो, नेवरे, बोंदाय, मेस्तावाडा, काब दी राम आणि  नुवें भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

संबंधित बातम्या