तालुक्यातील काही भागांत वीज खंडित 

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

काही तातडीच्या महत्वाच्या दुरुस्तीसाठी पेडणे तालुक्यातील विविध भागांत आजपासून सकाळी ९ते दुपारी 2 वाजे पर्यंत वीज पुरवठा खंडित ठेवण्यात येणार आहे.

पेडणे : काही तातडीच्या महत्वाच्या दुरुस्तीसाठी पेडणे तालुक्यातील विविध भागांत आजपासून सकाळी ९ते दुपारी 2 वाजे पर्यंत वीज पुरवठा खंडित ठेवण्यात येणार आहे.

शुक्रवार ता. ६ रोजी हणखणे हेदुस ग्राम पंचायत क्षेत्र, सोमवार ता. ९ रोजी वझरी ग्रामपंचायत क्षेत्र,गुरुवार ता. १२ रोजी कासारवर्णे ,चांदेल हसापुर, हणखणे हेदुस ग्रामपंचायत क्षेत्रातील वीज पुरवठा खंडित ठेवण्यात येइल असे
 पेडणे वीज कार्यालयाचे सहाय्यक अभियंते दामोदर तारी यांनी एका निवेदनाद्वारे नागरिकांना 
कळविले आहे.

संबंधित बातम्या