कोरोनामुक्त झाल्यानंतरचा 'योग'मंत्र

कोरोनामुक्त झाल्यानंतरचा 'योग'मंत्र
Yoga.jpg

कोविड—19 (Covid 19) वर मात केली आहे मात्र त्यानंतरही तुम्हाला दम लागतोय? श्वास घेण्यास त्रास होतोय? कोरोनातून बरं होणं म्हणजे नुसतं ‘आजारी नाही’ असं नसून ‘रिकव्हरी (Recovery) आणि रिहॅबिलिटेशन’ (Rehabilitation) हे दोन्ही अविभाज्य भाग आहेत. या प्रवासात तुम्हाला योगासने (yoga) आणि प्राणायाम मोलाची साथ देऊ शकतात. (Practice yoga post COVID treatment, says health experts)

कोविड 19 ने सव्वा वर्षांपासून संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. योग्यवेळी निदान, औषधोपचार या बळावर लाखो लोकांनी कोरोनावर विजय मिळवला. पण कोरोना विषाणूविरोधातील युद्ध इथेच संपत नाही. त्यातच जर आधीपासूनच सहव्याधी किंवा शारीरिक समस्या असतील, तर आणखी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरवर अधिक काळ राहिल्यामुळे कोरोनामुक्त झाल्यानंतर फुफ्फुसांना इजा होण्याची शक्यता असते. दम लागणे, श्वास घेण्यास त्रास अशा नवीन व्याधींचा सामना करावा लागू शकतो. डॉक्टरांच्या मते, कोरोनामुक्त झाल्यानंतर गाफील राहून चालणार नाही. 

मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, एखादा रुग्ण कोविडमुक्त झाला तरी त्याला सतत भीती वाटत असते. स्ट्रेसमुळे सर्व आंतरिक इंद्रियांवर अतिरिक्त भार पडतो आणि त्यांची ठरलेली कामे उत्तमप्रकारे होऊ शकत नाहीत. असे दीर्घकाळ चालू राहिले तर अनेक रोगांचा शिरकाव चालू होतो.

शरीराच्या आणि मनाच्या फिटनेससाठी योगसाधनेची मोठी मदत होते. मात्र, नेमकी कोणती आसने करायची, किती वेळ करायची, कधी करायची, कोणते प्राणायाम करायचे, असे अनेक छोटे-छोटे प्रश्न अडथळे बनून उभे राहतात. या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आता ‘ई गोमन्तक’ मधून मिळणार आहेत. योगप्रशिक्षक देवयानी एम. यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 17 जूनपासून (गुरुवार) या संबंधित लेख, विविध आसन-प्राणायामांची माहिती आणि व्हिडिओ तुम्हाला 'ई गोमन्तक' च्या वेबसाइटवर वाचायला व बघायला मिळतील.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com