शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान योजनेतील लाभार्थ्यांच्या यादीतील आपली नावे तपासून घ्यावीत- प्रकाश जावडेकर

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑक्टोबर 2020

प्रकाश जावडेकर यांनी गोव्यातील सर्व शेतकर्‍यांना त्यांची नावे पंतप्रधान किसान योजनेतील लाभार्थ्यांच्या यादीत आहेत की नाहीत, याची चौकशी करून घेण्याचे सांगितले आहे.

पणजी- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गोव्यातील सर्व शेतकर्‍यांना त्यांची नावे पंतप्रधान किसान योजनेतील लाभार्थ्यांच्या यादीत आहेत की नाहीत, याची चौकशी करून घेण्याचे सांगितले आहे. ही यादी विभागीय कृषी अधिकाऱ्यांकडे असून  शेतकऱ्यांनी आपल्या नावांची खात्री करून घेण्याची विनंती जावडेकर यांनी यावेळी केली.  

केंद्र सरकारने नुकत्याच आणलेल्या कृषी कायद्यावरही त्यांनी यावेळी भाष्य केले. 'पंजाब वगळता देशात अन्यत्र कुठेही या कायद्याला विरोध होत नसून मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की हा कायदा देशातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच असून शेतकऱ्यांनी याला विरोध करू नये,' अशी विनंती त्यांनी उपस्थितांना केली.  
 

संबंधित बातम्या