गुदिन्होंच्या अर्जात अक्षयाला लेखी बाजू मांडण्यास खंडपीठाची परवानगी

गुदिन्होंच्या अर्जात अक्षयाला लेखी बाजू मांडण्यास खंडपीठाची परवानगी

पणजी : मेरशीचे पंच याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या संशयित विल्सन गुदिन्हो याच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणावेळी लेखी बाजू मांडण्यास अक्षया नाईक हिला परवानगी देताना तिचा हस्तक्षेप अर्जाला अंशतः मान्यता मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिली आहे. संशयित गुदिन्हो याच्या अर्जावरील सुनावणी उद्या ७ रोजी खंडपीठाने ठेवली आहे.

या हस्तक्षेप अर्जाला संशयित गुदिन्हो याच्या वकिलानी त्याला विरोध केला होता. मयत प्रकाश नाईक याची बहीण अक्षया नाईक हिने संशयिताच्या अर्जावरील सुनावणीवेळी बाजू मांडण्यास परवानगी देण्याची विनंती केली होती. गोवा खंडपीठाने तिच्या अर्जातील विंनती अंशतः मान्य करून हस्तक्षेप अर्ज निकालात काढला.

हस्तक्षेप अर्जदाराला संशयित गुदिन्हो याच्या अर्जावरील सुनावणीवेळी युक्तिवाद परवानगी न देण्याची विनंती करण्यात आली होती. प्रकाश याची बहीण अक्षया नाईक हिने पोलिसांत दिलेल्या जबानीत दिलेली माहिती न पटणारी आहे. प्रकाशचा मृत्यू हा आत्महत्या किंवा खून यापैकी झाला आहे. त्याचा तपास पोलिसांनी करून सत्य बाहेर आणण्याची गरज आहे.

पोलिसांनी संशयिताच्या अटकपूर्व जामिनाला विरोध केला आहे त्यामुळे पोलिस त्यांची भूमिका बजावण्यात समर्थ आहेत. या हस्तक्षेप अर्जाला परवानगी देण्याची गरज नाही असा युक्तिवाद संशयित गुदिन्हो यांचे ज्येष्ठ वकिल नितीन सरदेसाई यांनी केला होता.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com