CM Pramod Sawant: डिचोलीत युनानी, नॅचरोपॅथी ओपीडी सुरू करणार !

Goa: मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते डिचोलीत दीनदयाळ हॉस्पिटलच वास्तूच्या शिलान्यास उत्साहात
Hospital Foundation
Hospital Foundation Dainik Gomantak

Goa: जनतेच्या सेवेसाठी आयुर्वेद आणि होमिओपॅथीसह सिद्धा, युनानी आणि नॅचरोपॅथी ओपीडी सुरु करण्याचा सरकारचा विचार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डिचोलीत बोलताना सांगितले. दीनदयाळ जनसेवा प्रतिष्ठानच्या बहुउद्धेशीय हॉस्पिटल प्रकल्पाच्या वास्तू शिलान्यास सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. सावंत प्रमुख पाहूणे या नात्याने बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे आणि जागतिक आरोग्य संघटनेने देशात प्रथमच पारंपरिक औषधांचे संशोधन सुरु होणे. ही देशाच्या वैद्यकीय क्षेत्रातील मोठी उपलब्धी आहे, असे मतही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केले.

काल आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट,भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, माजी सभापती राजेश पाटणेकर, नागराध्यक्ष कुंदन फळारी, इंडियन ऑईल कोर्पोरेशनचे व्यवस्थापक रंजनकुमार महापात्रा, कार्यकारी व्यवस्थापक अनिर्बान घोष, अन्य अधिकारी, दीनदयाळ जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष वल्लभ साळकर, उपाध्यक्ष कांता पाटणेकर अन्य संचालक, नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते.

आयओसीचे रंजनकुमार महापात्रा यांनी इस्पितळ नियोजित वेळेत पूर्ण होणार. असा विश्वास व्यक्त करुन दीनदयाळ जनसेवा प्रतिष्ठानला शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन कांता पाटणेकर यांनी केले. अरुण नाईक यांनी आभार मानले.

Hospital Foundation
Mopa Airport : मोपाच्या नामांतरावर सूचक मौन; पर्रीकरांच्या नावावर मुख्यमंत्र्यांनी बोलणं टाळलं

हा प्रकल्प आहे काय?

सुमारे 22 कोटी रुपये खर्च करुन व्हाळशी येथील आयटीआय जवळ हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी इंडियन ऑईल कोर्पोरेशन कंपनीने ''सीआरएस'' योजनेखाली पहिल्या टप्प्यात 10.36 कोटी रुपये मंजूर केले आहेत. नोव्हेंबर 2023 पर्यंत हा प्रकल्प पूर्णत्वास आणण्याचा संकल्प दीनदयाळ जनसेवा प्रतिष्ठानने केला आहे. या इस्पितळाचा प्रामुख्याने उत्तर गोव्यातील जनतेला फायदा होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com