" गोवा नगरपालिका निवडणूकीसाठी नेत्र चिकित्सा शिबिरे स्टंट नव्हे"

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

ही शिबिरे म्हणजे केवळ नगरपालिका निवडणूकीसाठी स्टंट नसून सरकारला गोमंतकियांच्या आरोग्याची काळजी आहे. अशी 100 शिबिरे गोवाभर आयोजित करण्याचा सरकारचा निर्धार आहे.

फातोर्डा: गोव्याचे भाजप सरकार हे सर्वसामान्यांचे आहे. नागरिकांच्या हिताच्या योजना सरकार राबवित आहे. परंतु विरोधक कोणत्याही थराला जावून टीका करीत आहे. पण, हे सरकार लोकहित व लोककल्याणासाठी आहे. यात नागरिकांचे आरोग्य महत्वाचे असल्यासे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. 'व्हीजन फॉर ऑल' या येजने अंतर्गत आयोजित नेत्र चिकित्सा शिबिरीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी रवींद्र भवनचे सदस्य सचिव प्रसन्न आचार्य. डॉ. दिपा कुरैंया, डॉ दीपा नायक. डॉ. अंजू खरंगटे. डॉ. धनंजय व डॉ. सुधाकर व्ही. हे मान्यवर उपस्थित होते.

गेल्या वर्षभरात कोविड मुळे नागरिक सरकारी इस्पितळात जात नसत. त्यामुळे आता नेत्र चिकित्सेसाठी लोकांची गर्दी सुरू झाली. हे लक्षात घेऊन लोकांनी सरकारी इस्पितळात येण्यापेक्षा सरकारने लोकांपाशी जावे या प्रामाणिक हेतूने अशा जाहीर शिबिराचे आयोजन करण्याचा निर्णय सरकारने घेतला. ही शिबिरे म्हणजे केवळ नगरपालिका निवडणूकीसाठी स्टंट नसून सरकारला गोमंतकियांच्या आरोग्याची काळजी आहे. अशी 100 शिबिरे गोवाभर आयोजित करण्याचा सरकारचा निर्धार आहे. डिचोली, म्हापसा, कुंकळ्ळी. काणकोण, केपे, सांगे नंतर मडगावचे हे सातवे शिबिर आहे.  शिवाय अशी शिबिरे केवळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही आयोजित केली जातील. एप्रिल महिन्यापासून प्रत्येक ग्रामपंचायत भागात शिबिरे आयोजित केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

शिवजयंती : छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य पिढ्यान् पिढ्या सगळ्यांना प्रेरणा देत राहिल 

या सरकारी कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व या भागातील आमदार विजय सरदेसाई उपस्थित नसल्याचे आश्चर्य त्यांनी सुरवातीलाच व्यक्त केले. डोळे हे महत्वाचे इंद्रिय आहे. कानांनी ऐकलेल्या गोष्टीपेक्षा स्वत: डोळ्यांनी पाहून घेतलेला अनुभव जास्त महत्वाचा व फायदेशीर असतो, असे रवींद्र भवनचे अध्यक्ष दोमोदर नाईक यांनी आपल्या भाषणात सांगितले. याप्रसंगी डॉ. रूपा नायक, सुरज नाईक यांनीही विचार व्यक्त केले आहे. डॉ, प्रतिक्षा कुंकळ्येकर यांनी आभार मानले. हे शिबीर रवींद्र भवन मडगाव, प्रसाद नेत्रालय (उडुपी), कलरकॉन एशिया प्रा.लि. एसिलर व्हिजन फाउंडेशन (बेंगळूरू) नेत्र ज्योती चॅरिटेबल ट्रस्ट उडुपी यांच्या संयुक्त विध्माने आयोजित करण्यात आला होता.

मोप विमानतळासाठी जमीन देण्यास जोरदार विरोध; ग्रामस्थ ताब्यात 

संबंधित बातम्या