गोव्याच्या वैद्यकीय पर्यटनात गुंतवणूक करा

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 15 मार्च 2021

आरोग्य सेवा देणार्यांनी गोव्यामध्ये वैद्यकीय पर्यटन उद्योगात गुंतवणूक करावी, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे.

पणजी: आरोग्य सेवा देणार्यांनी गोव्यामध्ये वैद्यकीय पर्यटन उद्योगात गुंतवणूक करावी, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे. पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेच्या पीएमएसवायवाय अंतर्गत बनवलेल्या मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल मधील 500 बेड असलेल्या सुपर स्पेशालीटी ब्लॉक चे लवकरच उदघाटन होणार आहे. गोवा राज्य हे पर्यटनासाठी ओळखले जाते. गोव्याचे मूळ सौंदर्य हे जगभरातील लोकांना पर्यटनासाठी आकर्षित करते. आम्हाला गोव्याला वैद्यकीय पर्यटनाचे प्रमुख स्थान बनवायचे आहे," असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले. 

गोव्यातील बैंक कर्मचाऱ्यांनी पुकारला पणजीतील आझाद मैदानावर संप 

यानंतर टाइम्स ग्रुप च्या कॉफी टेबले बुक कार्यक्रमात 'टाइम्स द गॅलॅक्सी' शायनिंग नेफ्रोस्टार्सचे त्यांनी अनावरण केले. आणि त्यानंतर सावंतांनी हेअल्थकेर प्रदात्यांना गोवा येथे येऊन गुंतवणूक करण्यास आमंत्रित केले.

गोवा राज्य आरोग्य खात्यातर्फे विशेष महा कोविड लसीकरण 

संबंधित बातम्या