पेडणे मामलेदार कार्यालयात रिक्त पदे तात्काळ भरा: शहापूरकर

कोरगाव येथे उद्या शुक्रवार दिनांक 1 रोजी सरकार तुमच्या दारी हा कार्यक्रम आयोजित करीत आहे. त्या पाश्वभूमीवर आप पक्षाने (Aam Aadmi Party) ही मागणी केली आहे.
पेडणे मामलेदार कार्यालयात रिक्त पदे तात्काळ भरा: शहापूरकर
Prasad ShahapurkarDainikGomantak

पेडणे (Pernem) तालुक्यासाठी असलेल्या मामलेदार कार्यालयात एकूण 16 रिक्त पदे असून नागरिकाना चांगली सोय देण्यासाठी रिक्त पदे भरण्यासाबरोबरच कार्य तप्तर अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे मांद्रे मतदार संघाचे (Mandre Constituency) प्रभारी प्रसाद शहापूरकर (Prasad Shahapurkar) यांनी केली आहे. कोरगाव येथे उद्या शुक्रवार दिनांक 1 रोजी सरकार तुमच्या दारी हा कार्यक्रम आयोजित करीत आहे. त्या पाश्वभूमीवर आप पक्षाने ही मागणी केली आहे.

Prasad Shahapurkar
Goa Election: काँग्रेसने केली 38 मतदारसंघांमध्ये गट अध्यक्षांची निवड

सध्या पेडणे मामलेदार कार्यलय हे मुख्यलीपिक विना आहे, मुख्यालीपिक 31 ऑगस्ट रोजी सेवा निवृत्त झाले. त्यानंतर हे पद अजूनही भरलेले नाही. कार्यालयात सरकार इन्स्पेक्टर 2, प्युव्न 4, तलाठी 4, लिपिक 5, अश्या जागा रिक्त आहेत, कार्यालय राखण्यासाठी असलेले बापू हे पाच वर्षापूर्वी निवृत्त झाले, त्यांच्या जागी अजून कुणाची भारती केली नाही.

रिक्त जागा भरण्याबरोबरच कार्यालयात उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी कार्यतप्तरता दाखविणे गरजेचे आहे मामलेदार कार्यलयात सर्वसाधारण व्यति येते त्याना योग्य माहिती देणे, उगाच परत परत फेऱ्या मारणे थांबविणे गरजेचे आहे. मामलेदार ,उपजिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी अनेक वेळा तहकूब होतात, तेव्हा तारखा लांबच्या न देणे याकडे कटाक्ष ठेवणे गरजेचे आहे. या गोष्ठी व्यवस्थित केल्यातरच लोकांचे चांगले आशीर्वाद मिळू शकते असे प्रसाद शहापूरकर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.