गोवा फॉरवर्ड पक्षाच्या राजीनाम्याचे पत्र व्हाट्सएप फॉरवर्ड

Prashant Naik complained about posting a bogus letter on WhatsApp
Prashant Naik complained about posting a bogus letter on WhatsApp

मडगाव: गोवा फॉरवर्ड पक्षाचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते प्रशांत नाईक यांच्या नावे वॉटस्ॲपवर बोगस पत्र पोस्ट करण्यात आल्याची तक्रार  गुन्हा अन्वेषण विभागाच्या सायबर शाखेकडे नोंदवण्यात आली आहे. 


गोवा फॉरवर्डच्या उपाध्यक्षपदाचा मी राजीनामा देत असल्याच्या पत्राची प्रत वॉटसअॅपवर आज सकाळपासून फिरत आहे. कोणीतरी हा खोडसाळपणा केला आहे. पक्षाचा मी उपाध्यक्ष नव्हे, तर सरचिटणीस आहे. या पत्रात नमूद करण्यात आलेले पत्ताही चुकीचा आहे. मायण-कुडतरी येथे मी राहत नाही, तिथे माझे कार्यालयही नाही, असे नाईक यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. 


या पत्रात असलेली सही हुबेहूब माझ्या सहीसारखी असून माझ्या सहीची नक्कल करण्यात आली असावी किंवा माझ्या सहीची ती स्कॅन प्रत असावी, असेही नाईक यांनी तक्रारीत म्हटले आहे. या खोडसाळपणामुळे मला मनस्ताप झाला आहे. माझी प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न असून या प्रकरणातील गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी नाईक यांनी केली आहे.

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com