‘आप’च करेल गोव्याचा विकास: नाईक

‘आप’ हा एकच पक्ष असा आहे की, लोकांना दिलेला शब्द पाळतो
‘आप’च करेल गोव्याचा विकास: नाईक
AAPDainik Gomantak

केपे: ‘आप’ हा एकच पक्ष असा आहे की, लोकांना दिलेला शब्द पाळतो व यासाठी येणाऱ्या निवडणुकीत या पक्षाला सत्तेवर आणल्यास राज्याचा खऱ्या अर्थाने विकास होणार आहे, असे कुंकळ्ळीचे संभाव्य उमेदवार प्रशांत नाईक यांनी सांगितले. ते देमानी कुंकळ्ळी येथे घेतलेल्या कोपरा बैठकीत बोलत होते.

AAP
Goa AAP: गोव्यातील सरकार बेरोजगारीची समस्या सोडविण्यात अपयशी

यावेळी त्यांच्याबरोबर इनसिओ डिसौझा, आंतिनिओ फर्नांडिस व इतर मान्यवर उपस्थित होते. दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली चांगल्याप्रकारे काम करीत असून, त्यांनी दिल्लीत अनंत चांगली कामे केली आहेत व अशीच विकासकामे राज्यात होण्यासाठी या पक्षाचे प्रयत्न असणार असल्याचे नाईक यांनी सांगितले. सध्या राज्यात लोकांना नको असलेले प्रकल्प आणण्याचा सरकारचा प्रयत्न लोकांनी हाणून पडला आहे. अरविंद केजरीवाल हे दूरदृष्टी नेता असून लोकांना काय पाहिजे ते त्यांना माहीत आहे व यासाठी त्यांनी रोजगार व फुकट वीज देण्याचे वचन लोकांना दिले आहे, असे त्यांनी सांगितले.

AAP
AAP-Trinamool Congressकडून कॉंग्रेसच्या नेत्यांना करोडो रुपयांची आमिषे

कुंकळ्ळी मतदारसंघात अनेक विकासकामे प्रलंबित असून, जर आम आदमी पक्षाला आपण निवडून दिल्यास अनेक कामे मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करणार आहे, असे नाईक यांनी सांगितले. दिल्लीत या पक्षाने चांगले काम केले म्हणून दिल्लीतील लोकांनी केजरीवाल यांना परत निवडून दिले आहे, तोच विश्वास तुम्हीही या पक्षावर ठेवल्यास राज्याची प्रगती कोणीही रोखू शकणार नाही, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com