‘आप’ नव्हे, काँग्रेसच भाजपची ‘बी’ टीम

आम आदमी पक्षचा रस्त्यावर उतरून भाजपला प्रखर विरोध
Pratima Coutinho said  BJPs plan B team is Congress in Goa elections
Pratima Coutinho said BJPs plan B team is Congress in Goa elections Dainik Gomantak

मडगाव: गोव्यात भाजप सरकारने (BJP Government) जे कुप्रशासन चालविले आहे त्याच्याविरोधात गोव्यात काँग्रेस (Congress) फक्त तोंडदेखला विरोध करत आहे. उलट एकही आमदार नसताना आम आदमी पक्ष (AAP) रस्त्यावर उतरून भाजपला प्रखर विरोध करत आहे. यावरूनच गोव्यात भाजपची ‘बी’ टीम कोण हे स्पष्ट होते, असा आरोप आपच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो (Pratima Betsy Coutinho) यांनी केला.

काँग्रेसचे कार्याध्यक्ष आलेक्स सिक्वेरा यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत आप भाजपची ‘बी’ टीम असल्याने काँग्रेस विरोधात खोटी माहिती पुरवून बुद्धिभेद करत आहे, असा आरोप केला होता. त्याला उत्तर देण्यासाठी कुतिन्हो यांनी आज नावेली येथे पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर टीका केली. जर आलेक्स सिक्वेरा एवढे भाजपच्या विरोधात आहेत तर मागच्या पाच वर्षात त्यांनी भाजप विरोधात किती मुद्दे उठवून त्यांना विरोध केला हे स्पष्ट करावे, अशी मागणी केली.

गोव्यात काँग्रेसचे भाजपशी कसे साटेलोटे आहेत ते आम्ही सांगण्याची गरज नाही. त्यांचेच मुक्त प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो यांनी ते सांगितले आहे. यासाठीच आज लोक आपकडे पर्याय म्हणून पाहतात असे त्या म्हणाल्या.

...तर नाव उघड करा...

सिक्वेरा यांनी आपचे पदाधिकारी आपल्याकडे आपण त्यांच्या पक्षात सामील व्हावे म्हणून आले होते, असे म्हटले होते. त्याचा समाचार घेताना त्यांच्याकडे हा प्रस्ताव घेऊन कोण आले होते हे त्यांनी स्पष्ट करावे. आप हा युवा नेतृत्वावर विश्वास ठेवणारा पक्ष असून आम्हाला सिक्वेरासारख्या आजोबांची गरज नाही, असे प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या.

Pratima Coutinho said  BJPs plan B team is Congress in Goa elections
पणजीत उत्कंठा शिगेला! उत्पल की बाबूश?

‘आप’च्या परिवर्तन यात्रेची घोषणा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने ‘परिवर्तन यात्रा’ या नव्या मोहिमेची घोषणा केली आहे. पक्षाच्या प्रचार मोहिमेचा हा एक भाग आहे. परिवर्तन यात्रेत पक्षाचे नेते प्रत्येक मतदारसंघात पंचायतनिहाय सभा घेणार आहेत. या दरम्यान पक्षाचे नेते पक्ष, केजरीवाल मॉडेल आणि त्यांनी जाहीर केलेल्या योजना आणि हमीबद्दल जागरूकता निर्माण करतील, अशी माहिती आपचे उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पक्ष शुक्रवारपासून कळंगुट, वेळ्ळी आणि दाबोळी येथून या मोहिमेला सुरवात करणार आहे. आगामी निवडणुकांपूर्वी ‘आप’ राज्यात सुमारे ३०० सभा घेण्याची योजना आखत आहे. आपला गोव्यातून मिळालेला प्रतिसाद पाहून भाजप आणि त्यांची बी टीम काँग्रेस घाबरली आहे. भाजप आणि काँग्रेस निवडणूक पूर्व सेटिंगमध्ये व्यस्त असताना आप लोकांच्या समस्या समजून घेण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी काम करत आहे. दुसरीकडे भाजपच्या स्थानिक नेत्यांना राज्यातील प्रचाराची धुरा सांभाळता येत नाही. त्यामुळे भाजपचे हायकमांड राष्ट्रीय नेत्यांना गोव्यात पाठवत आहे. आगामी निवडणुकीत भाजपचा पराभव होणार हे आता त्यांच्या लक्षात आले आहे, असे नाईक म्हणाले.

Pratima Coutinho said  BJPs plan B team is Congress in Goa elections
भंडारी समाजातील अंतर्गत मतभेद तीव्र

प्रामाणिक प्रशासन ‘आप’च देईल

दीड वर्षांपासून आप प्रचार करत असून, अलीकडेच पक्षाने घरोघरी प्रचार सुरू केला आहे. सामान्य लोकांशी जोडण्यासाठी सभा आयोजित केल्या जातात. आमच्यासारखे सामान्य लोक कधीच राजकारणात नव्हते; पण राज्याची स्थिती पाहून त्यांच्यापैकी अनेकांनी ‘आप’मध्ये प्रवेश केला आणि राज्यात बदल घडवून आणण्याचा संकल्प केला आहे. गोव्याला प्रामाणिक प्रशासनाची गरज आहे आणि ती फक्त आपच देऊ शकते, असे अमित पालेकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com