पारंपरिक व्यवसायाला प्राधान्य देणारा प्रवीण बगळी

प्रतिनिधी
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

पारंपरिक व्यवसाय व त्याचे जतन करणारे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. सरकारी नोकरी किंवा चांगल्या पगारावर काम करण्यासाठी युवकांचा नागरिकांचा कल असतो.

मोरजी:  पारंपरिक व्यवसाय व त्याचे जतन करणारे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. सरकारी नोकरी किंवा चांगल्या पगारावर काम करण्यासाठी युवकांचा नागरिकांचा कल असतो.

मात्र आगरवाडा येथील प्रवीण बगळी हा नागरिक आजही पूर्वजांचा पारंपारिक पांढरे शुभ्र मीठ काढण्याचा पारांपारीक व्यवसाय तीन पिढ्यापासून करत आहे .
मिठागरात काम करत असताना  शरीराला व्यायाम मिळतोच शिवाय आरोग्य तंदुरुस्त असते. आगरवाडा हा गाव याच मिठागरा वरून नावारुपास आला आहे. या गावात मोठ्या प्रमाणात पांढरे शुभ्र मिठागरे आहेत ,पारंपारिक पद्धतीने काम करणारे या गावात अनेक व्यवसाईक आहेत ,त्यांनी कधी नोकरीचा ध्यास घेतला नाही ,त्यातील प्रवीण बगळी एक.

मिठाचा स्वाद खारट व सफेद रंगाचे मीठ केवळ आगरवाडा मिठागरातूनच मिळू शकते . हे मीठ निसर्गपद्धतीने आणि पारंपरीक पद्धतीने तयार केले जाते . येथले व्यावसायिक जून महिना आला की शेतीची मशागत करतात त्याच प्रमाणे पारंपारिक मीठ व्यवसायालाही प्राधान्य  देतात .

एक होतकरू व उत्साहित तरुण गेली 40 वर्षे मिठाचा व्यवसाय करतो , आवडीने त्यात रमून पैसा मिळवून आपला घर संसार चालवतो ,मातीत हात घालून मिठागरातून तो प्रामाणिक  मीठ उत्पादन करत आहे .

प्रवीण बगळी यांनी माहिती देताना आपण चौदा वर्षाचा असताना  या व्यवसायात उतरलो ,आजोबां ,नंतर वडील व आता आपण या क्षेत्रात आहे .

सुरुवातीला आपण आगारातील मीठ काढून वरती साठवून ठेवणे नंतर मीठ कसे तयार केले जाते ,किती पाणी भरतीवेळी नदीचे खारट आगारात घ्यावे हे वडीलाकडून शिकलो . वडील आपण व भाऊ सुरुवातीला मीठ काढायचे आता आपण स्वता एकटाच आगार काढतो मात्र मिठ उत्पादन कमी केले नाही .

प्रवीण बगळी यांनी सांगितले आपण हा व्यवसाय पूर्वजाचा सांभाळून करत आहे . नोकरीच्या मागे न धावता आपण हा व्यवसाय जसा सांभाळून करत आहे तसाच तो इतरांनी आपला पारंपारिक व्यवसाय करावा अशे त्यांनी युवकांना आवाहन केले आहे . 

संबंधित बातम्या