प्रवीण आर्लेकर यांचा भाजप प्रवेश निश्चित

2 जानेवारीला पणजीत ते भाजपमध्ये प्रवेश करतील.
Pravin Arlekar 

Pravin Arlekar 

Dainik Gomantak 

पणजी: पेडणे मतदार संघातील मगो पक्षाचे संभाव्य उमेदवार प्रवीण आर्लेकर यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. 2 जानेवारीला पणजीत ते भाजपमध्ये प्रवेश करतील. या प्रवेश समारंभाला मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant), भाजपा प्रभारी देवेंद्र फडणवीस, पक्षाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, उपस्थित राहणार आहेत.

<div class="paragraphs"><p>Pravin Arlekar&nbsp;</p></div>
लोकशाहीत जनताच 'सुप्रीम':श्रीधरन पिल्लई

गेल्या वर्षभरापुर्वीपासून प्रवीण आर्लेकर (Pravin Arlekar) यांनी आपण मगोप (MGP) तर्फे पेडणेमधून निवडणूक लढवणार असे जाहीर केले होते. त्यांनी मतदारसंघात सक्रिय प्रचाराला सुरुवात केली होती. गेले वर्षभर त्यांनी विविध समाज घटकांशी संपर्क साधत विद्यमान भाजपचे आमदार बाबू आजगावकर यांच्या विरोधात आवाज उठवला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते भाजपच्या (BJP) संपर्कात असल्याची चर्चा होती. दरम्यान, मागील आठवड्यातच मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर (Deepak Dhavalikar) यांच्यासोबत पत्रकार परिषद घेऊन आपण मगो सोबतच आहे असे जाहीरही केले होते. पण दोन दिवसात घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर आर्लेकर यांनी मगोपचा राजीनामा दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com