राजधानी पणजीतील पावसाळापूर्व कामं अजूनही रखडलेलीच

येत्या 4 मे रोजी होणाऱ्या बैठकीत विषय मांडणार असल्याची उदय मडकईकर यांची माहिती
राजधानी पणजीतील पावसाळापूर्व कामं अजूनही रखडलेलीच
Panjim CityDainik Gomantak

पणजी : पणजी महानगरपालिकेने अद्यापही पावसाळापूर्व कामांना सुरुवात केलेली नाही. पाऊस अवघ्या सव्वा महिन्‍यांवर येऊन ठेपला आहे. तरीही पावसाळापूर्व कामे सुरु झाली नसल्‍याने नागरिकांतून रोष व्‍यक्‍त केला जात आहे. अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचत असून याच पार्श्वभूमीवर तातडीने प्रशासनाने पावसाळापूर्व कामांना सुरुवात करण्याची मागणी आता केली जात आहे.

Panjim City
म्हापशात अहोरात्र बेघरांचा मुक्तसंचार

यासंबंधी पणजीचे माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक उदय मडकईकर म्‍हणाले की, सर्वसाधारणपणे 5 जून रोजी पावसाला सुरुवात होईल, असे गृहीत धरून शहरातील पावसाळापूर्वी कामांना सुरुवात केली जाते. आपल्या महापौरपदाच्‍या कारकीर्दीत एप्रिल अखेर 40 टक्‍के कामांची पूर्तता झालेली असायची. शहरातील नाले, गटारे, झाडांच्‍या फांद्यांची छाटणी, रस्‍त्‍यावरील खड्डे बुजवणे आदी कामे केली जायची. पावसाळा अवघ्या महिन्‍यावर येऊन ठेपला आहे. त्‍यातच गेल्‍या पंधरा दिवसांत अवकाळी पाऊस थैमान घालत आहे. अशावेळी शहरातील कामे सुरू करणे आवश्‍यक होते. 4 मे रोजी होणाऱ्या पालिकेच्या बैठकीत हा विषय मांडणार असल्‍याचे मडकईकर यांनी स्पष्ट केलं आहे.

Panjim City
सुभाष वेलिंगकर दुसरे इंक्विजिशन आणू पाहत आहे : फादर व्हिक्टर फेर्राव

पणजी पालिका क्षेत्रातील एकाही प्रभागातील पावसाळापूर्व कामे झाल्‍याचे दिसून येत नाही. अधूनमधून कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे शहरातील अनेक गटारे आणि नाले तुंबल्‍याचे दिसून आले. तसेच रस्‍त्‍यांवरील खड्ड्यात पाणी साचल्‍याने किरकोळ अपघातही झाले. अनेक ठिकाणी झाडांच्‍या फांद्या रस्‍त्‍यावर पडल्‍या. तर काही ठिकाणी फांद्या वीज वाहिन्‍यांवर पडल्‍यामुळे पणजीवासीयांना खंडित वीज पुरवठ्याचा सामना करावा लागला. पणजी महानगरपालिका प्रशासनाने यात तातडीने लक्ष घालून पावसाळापूर्व कामे ताबडतोब सुरू करावीत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.