Konkan Railway : कोकण रेल्वे तर्फे मान्सूनपूर्व कामे सुरू; ट्रॅकचीही तपासणी

कोकण रेल्वेकडून सुरक्षिततेची काळजी घेण्यात येत आहे
Konkan Railway
Konkan RailwayDainik Gomantak

पावसाळ्यात प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी कोकण रेल्वे ट्रेक मार्गावर मान्सूनपूर्व कामांना सुरुवात करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी धोकादायक झाडे छाटणे, नाले उपसणे तसेच डोंगरकड्यांचा आढावा घेणे, ट्रॅकची तपासणी करणे ही कामे सुरु करण्यात आली आहे.

मागील दहा वर्षांच्या काळात अशा प्रकारे दक्षता कोकण रेल्वेकडून सुरक्षिततेची काळजी घेण्यात येत असल्याने कोणताही मोठा अपघात झालेला नाही.

Konkan Railway
E-challan: महत्वाची बातमी! ... तोपर्यंत ई-चलनची अंमलबजावणी होणार नाही, माविन गुदिन्हो यांनी सांगितले कारण

यावर्षीही रुळानजिक नालेसफाई व झुडपांची तोड व दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी माहिती वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली. जनूपासन पावसाळ्यातील वेळापत्रक जाहीर केले जाते.

सुरक्षा उपायांमुळे दुर्घटनांत घट !

मागील काही वर्षांत रेल्वे मार्गावर सुरक्षा कार्ये राबवल्याने माती, दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे व कोणताही मोठा अपघात घडलेला नाही. रेल्वे सुरक्षितपणे चालवल्या जाव्यात यासाठी कोकण रेल्वेकडून विहित मार्गदर्शक तत्त्वांनुसार मान्सून पेट्रोलिंग केले जाते. आपत्तीत या सर्व ठिकाणावर लक्ष ठेवण्यासाठी वेर्णा येथे अपघात निवारण ट्रेन सज्ज ठेवण्यात येते, असे बबन घाटगे म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com