गर्भवती मादी बिबट्याचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू

पोखरमेळ-काले येथील धक्कादायक घटना
गर्भवती मादी बिबट्याचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू
Pregnant female leopard dies in train crash Dainik Gomantak

धारबांदोडा: पोखरमळ काले येथे रेल्वेच्या धडकेने मादी बिबटा ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री 7.30 च्या दरम्यान घडली. मोले वन्यजीव विभागाचे वनाधिकारी सिध्देश नाईक यांनी या वृत्ताला दुजाेरा देत माहिती दिली आहे.

Pregnant female leopard dies in train crash
बोंडला राष्ट्रीय उद्यानात पुन्हा सुरू होणार ‘राजा-राणी’ या वाघांचा संसार

मिळालेल्या माहितीनुसार, दगावलेल्या बिबटा मादी असून ती अंदाजे तीन चार वर्षांची असल्याचा अंदाज आहे. ती गरोदरही होती. ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे, तिथे रेल्वेमार्गाचे लहान वळण आहे. त्यामुळे बिबट्या रेल्वेमार्ग ओलांडताना कदाचित रेल्वे इंजीनची लाईट बिबट्यावर पडली असावी त्यामुळे ती गोंधळली असावी.

अंतिम संस्कारही...

बिबट्याला काले येथून मोले येथे आणण्यात आल्यानंतर बोंडला येथील वनखात्याच्या वैद्यकीय पथकाकडून शवविच्छेदन करण्यात आले. यात बिबट्या गरोदर असल्याचे आढळून आले. तिच्या पोटात दोन पिल्ले होते. त्यानंतर वनखात्याच्या नियमानुसार मोले येथे अंतिम संस्कार करण्यात आले.

Related Stories

No stories found.