गोव्यात विज्ञान महोत्सवाची पूर्व तयारी सुरू; ज्येष्ठ शास्त्रज्ञ साधणार विद्यार्थ्यांशी संवाद

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 7 मार्च 2021

राज्यात विज्ञान महोत्सवाची पूर्व तयारी म्हणून शाळांत विज्ञान विषयक जाणीवा रुजाव्यात यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधणे सुरू केले आहे. विज्ञान परिषद महोत्सवाच्या सहाव्या आवृत्तीचे आयोजन विज्ञान परिषद गोवातर्फे 17 व 18 मार्च रोजी पणजीतील मॅकिनेज पॅलेस येथे आयोजन करण्यात आले आहे.

पणजी :  राज्यात विज्ञान महोत्सवाची पूर्व तयारी म्हणून शाळांमध्ये विज्ञान विषयक जाणीवा रुजाव्यात यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधणे सुरू केले आहे. विज्ञान परिषद महोत्सवाच्या सहाव्या आवृत्तीचे आयोजन विज्ञान परिषद गोवातर्फे 17 व 18 मार्च रोजी पणजीतील मॅकिनेज पॅलेस येथे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी हा महोत्सव चार दिवसांचा असतो. परंतु कोरोना महामारीमुळे यंदा दोन दिवसांपुरते आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानात रूची निर्माण करण्यावर केंद्रीत करण्यात आले असून त्यांचे लक्ष्य गाठण्यासाठी महोत्सवातर्फे गोव्यातील ग्रामीण भागातील विविध शाळांमध्ये महोत्सवपूर्व कार्यक्रमांच्या आयोजनाला सुरवात झाली आहे. हे उपक्रम 15 रोजीपर्यंत सुरू राहणार आहेत.

गोवा राज्य सहकारी बॅंक’ ‘राज्य’ या व्याख्येत बसत नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा निवाडा

गोवा विज्ञान परिषदेचे अध्यक्ष सुहास गोडसे यांनी सांगितले, की या उपक्रमांना मिळत असलेल्या उदंड प्रतिसादावर आम्हाला खरोखर आनंद होत आहे आणि महोत्सवातही अशाचप्रकारचा प्रतिसाद मिळण्याची आशा आहे. शहरी किंवा ग्रामीण असो, प्रत्येक विद्यार्थ्याला विज्ञानाच्या अफाट ज्ञानापर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. महोत्सवात विज्ञान वैशिष्ट्य चित्रपटांचे प्रदर्शन, शिक्षकांसाठी कार्यशाळा, पत्रकारांसाठी विशेष कार्यशाळा आणि चित्रपट निर्मितीवरील कार्यशाळेचा व मास्टरक्लासचा समावेश असेल. एक नाविन्यपूर्ण प्रदर्शनही जे महोत्सवाचे आकर्षण केंद्रबिंदू असेल. यात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगात वापरल्या जाणाऱ्या अफाट कल्पनांचे प्रदर्शन असणार आहे. सध्या महोत्सवपूर्व कार्यक्रम पुढील विद्यालयांत सुरू आहेत.

गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा जनसुनावणी उपस्थितांनी विरोध करूनही सुरूच

शांता विद्यालय (शिवोली), पीपल्स हायस्कूल (कामुर्ली), सरकारी हायस्कूल (डिचोली), सरकारी हायस्कूल (मेणकुरे), सरकारी हायस्कूल (चोर्ला), गणेश हायस्कूल (म्हापसा), सरकारी हायस्कूल (नामोशीगिरी), प्रगती हायस्कूल (वेरे), सारस्वत हायस्कूल (म्हापसा), कमळेश्वर हायस्कूल (कोरगाव), हरमल पंचक्रोशी हायस्कूल (हरमल), श्रीराम हायस्कूल हायस्कूल (कोलवाळ), सरस्वती हायस्कूल (जुवे), सेंट अलीयास हायस्कूल (दिवाडी), सीटीएन हायस्कूल (कुडचडे), सरकारी हायस्कूल (नावेली), सरकारी हायस्कूल (आमोणे), वसंत विद्यालय (शिवोली), सर्वोदय हायस्कूल (सावर्डे), हेडगेवार हायस्कूल (साखळी), सरकारी हायस्कूल (सांगे), विद्याप्रसारक हायस्कूल (मोरजी), श्री शांतादुर्गा हायस्कूल (पिर्ण), सरकारी हायस्कूल (साळ), शिवाजीराजे हायस्कूल (खोलपेवाडी), लुडस कॉन्व्हेंट साळगाव आणि पीडब्ल्‍यूएचएसएस (म्हापसा).

संबंधित बातम्या