''न्याय मिळवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत थांबण्याची तयारी''- गिरिष चोडणकर

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

विधानसभेच्या सभापतींनी आज न्याय देण्यासाठी किती वेळ घेतला तरी रात्री उशिरापर्यंत थांबण्याची आपली तयारी.

पणजी: विधानसभेच्या सभापतींनी आज न्याय देण्यासाठी किती वेळ घेतला तरी रात्री उशिरापर्यंत थांबण्याची आपली तयारी असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पर्वरी येथे विधानसभा संकुलाच्या बाहेर पत्रकारांना सांगितले.

गोव्यातील पंचायत सचिव पदांसाठी होणारी लेखी परीक्षा येत्या रविवारी

ते म्हणाले, ''आम्हाला न्याय हवा आहे. गेले दीड वर्षे आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत सभापतींकडे याचिका सादर करू आता दिड वर्ष होत आले. त्यावर सुनावणी होत नसल्याने आम्हाला सर्वोच्च न्यायालयातही जावे लागले होते. आज सभापतींनी सुनावणी सुरू केलेली आहे. त्यांनी आम्हाला न्याय द्यावा रात्री उशिरापर्यंत त्यांनी कामकाज केले तरी चालेल आमची थांबण्याची तयारी आहे.'' चोडणकर आणि मगोचे नेते सुदीन ढवळीकर यांनी सादर केलेल्या दोन अपात्रता याचिकांवर सभापती राजेश पाटणेकर यांनी आता भोजनोत्तर सत्रात सुनावणी सुरू केलेली आहे. ती सायंकाळी उशिरापर्यंत चालण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या