गोव्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी; गोवेकरांची दाणादाण

Goa Rainfall Updates : आज गोव्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे रस्त्यावरील लोकांची तारांबळ उडाली.
गोव्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी; गोवेकरांची दाणादाण
Goa Rainfall UpdatesDainik Gomantak

गोव्यात 11 मे ते 13 मे पर्यंत ठीकठिकाणी मेघगर्जनेच्या पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आली होती. बंगालच्या उपसागरावर असनी चक्रीवादळाच्या आफ्टर इफेक्टमुळे वातावरणात बदल झाल्याचे IMD ने सांगितले आहे.

आणि त्यामुळेच गोव्यासह संपूर्ण देशात ठिकठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता होती. त्याचप्रमाणे आज गोव्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे रस्त्यावरील लोकांची तारांबळ उडाली.

Goa Rainfall Updates
वास्कोत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, अज्ञाताविरोधात तक्रार दाखल

पणजीसह, ओल्ड गोवा, माशेल, साखळी, वाळपाईमध्ये पावसाच्या बारीकमोठ्या सरी बरसल्या आहेत. 'असनी चक्रीवादळामुळे, वारे खालच्या पातळीवर पश्चिमेकडे वाहत आहे, ज्यामुळे गोव्यात आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे.

पण पावसाच्या आगमनामुळे गोवेकरांना गारवा अनुभवायला मिळाला. वाढलेल्या गरमीमुळे सर्वच जण हैराण झाले होते. त्यामुळे दुपारनंतर हवेत काही प्रमाणात गारवा जाणवला.

दरम्यान, गोव्यात अजून 2 पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याचबरोबर गोव्यात मॉन्सूनपूर्व कामांना सुरुवात करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com