थिवी लायन्सचा स्थापना दिन संपन्न

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

थिवी लायन्स क्लबच्या सन २०२०-२१ वर्षासाठीचा २८ वा स्थापनादिन नूतन अध्यक्षा लायन पद्मजा शिरीष दिवकर यांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत थिवी लायन्स क्लबच्या इमारतीत संपन्न झाला.

अस्नोडा: थिवी लायन्स क्लबच्या सन २०२०-२१ वर्षासाठीचा २८ वा स्थापनादिन नूतन अध्यक्षा लायन पद्मजा शिरीष दिवकर यांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत थिवी लायन्स क्लबच्या इमारतीत संपन्न झाला.
क्लबच्या मावळत्या अध्यक्षा लायन रूपाली गवंडळकर यांनी मान्यवर व उपस्थितांचे स्वागत केले. क्लबच्या खजिनदार लायन उज्ज्वला वेरेकर यांनी मायबोली कोकणीतून ध्वजवंदना दिली. लायन श्रावण वेरेकर यांनी थिवी लायन्स क्लबचा २०१९-२० चा वार्षिक अहवाल सादर केला.

२०२०-२१ या वर्षासाठी अधिकार ग्रहण केलेले थिवी लायन्स क्लबचे नूतन संचालक मंडळ व अधिकाऱ्यांची नावे घोषित करण्यात आली. डॉ. सुष्मिता कर्पे यांचे नवीन सदस्य म्हणून नाव घोषित करण्यात आले.२०२०-२१ साठीच्या नूतन अध्यक्षा सौ. पद्मजा शिरीष दिवकर, संचालक मंडळ व अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.

संबंधित बातम्या