President Droupadi Murmu: 79 देश आणि 280 चित्रपट,राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा इफ्फीसाठी खास संदेश

गोवा देखील इफ्फीसाठी सज्ज होत आहे
President Droupadi Murmu
President Droupadi MurmuDainik Gomantak

गोव्यात 20 स्पटेंबरपासून 53 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (53rd edition of IFFI, the International Film Festival of India) सुरू होत आहे. महोत्सवात जगभरातील 79 देशातील 280 हून अधिक चित्रपट दाखवले जाणार आहेत. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर दोन वर्षांनी होत असलेल्या या महोत्सवाची सिनेरसिक आतुरतेने वाट पाहत आहेत. गोवा देखील या महोत्सवासाठी सज्ज होत आहे. दरम्यान, या महोत्सवासाठी (IFFI) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी सिनेरसिकांना खास संदेश लिहून इफ्फीला शुभेच्छा दिल्या आहेत.

President Droupadi Murmu
Gavpalan Tradition Of Chindar: घर, ग्रामपंचायत बंद करून गाव जातं पळून, काय आहे 'गावपळण' प्रथा?

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संदेशात काय म्हटले आहे?

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, आशिया खंडातील सर्वात जुन्या चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. महोत्सवाची सुरूवात झाल्यापासून आंतरराष्ट्रीय संबंधांना इफ्फीने महत्वाचे व्यासपीठ मिळवून दिले आहे. जगभरातील चित्रपट निर्माते, कलाकार, सिनेउद्योग व्यावसायिक आणि चित्रपट रसिकांना, विचारांची आणि समृद्ध अनुभवांची देवाणघेवाण करण्याची संधी हा महोत्सव उपलब्ध करून देतो. इफ्फी सर्व सिनेरसिकांना अविस्मरणीय अनुभव देईल. इफ्फीचे आयोजक आणि सहभागी होणाऱ्या सर्वांना शुभेच्छा.

President Droupadi Murmu
Congress Vs MNS: सावरकर वाद! मनसेच्या दादागिरी विरोधात काँग्रेसची गांधीगिरी

इफ्फीदरम्यान 118 आंतरराष्ट्रीय आणि 221 भारतीय चित्रपट कलाकार देखील उपस्थित राहणार आहेत. वेगवेगळ्या विषयावर आधारित, वेगवेगळ्या धाटणीचे अनेक चित्रपट या महोत्सवात सिनेरसिकांना पाहायला मिळणार आहेत. दोन वर्षानंतर होणाऱ्या या महोत्सवासाठी जगभरातील सिनेरसिक हजेरी लावणार आहेत. अद्यापपर्यंत पाच हजारहून अधिक सिनेरसिकांनी या महोत्सवासाठी नोंदणी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com