President Murmu On Goa Visit: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसीय दौऱ्यासाठी गोव्यात दाखल

दाबोळी विमानतळावर राष्ट्रपती मुर्मू यांचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
President Murmu On Goa Visit
President Murmu On Goa VisitDainik Gomantak

President Murmu On Goa Visit: तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू गोव्यात दाखल झाल्या आहेत. दाबोळी विमानतळावर राष्ट्रपती मुर्मू यांचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, वाहतूक आणि राजशिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू आजपासून (ता.22) प्रथमच तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आल्या आहेत. यादरम्यान त्या विद्यापीठ पदवीदान सोहळा, विधानसभा सदस्यांना मार्गदर्शन आणि वारसा स्थळांना भेटी देतील.

राष्ट्रपती आज आझाद मैदानावर जाऊन शहीद स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली अर्पण करून अभिवादन करतील. त्यानंतर त्या राजभवनाकडे रवाना होतील. तिथेच त्यांचा मुक्काम असेल.

President Murmu On Goa Visit
Droupadi Murmu Goa Visit: राष्ट्रपती आजपासून गोवा दौऱ्यावर; काही रस्त्यांवर वाहतुकीसाठी निर्बंध

मंगळवार, 22 रोजी राष्ट्रपती गोवा येथील राजभवन येथे त्यांच्या सन्मानार्थ गोवा सरकारने आयोजित केलेल्या नागरी सत्काराला उपस्थित राहतील. याप्रसंगी त्या निवडक लाभार्थ्यांना वन हक्क कायद्यांतर्गत ‘सनद’ वाटपही करणार आहेत.

राष्ट्रपती बुधवार, 23 रोजी सकाळी गोवा विद्यापीठाच्या 34 व्या पदवीदान सोहळ्याला उपस्थिती लावतील. सायंकाळी 4 वाजता विधानसभेच्या विशेष कार्यक्रमात सहभाग नोंदवतील. यावेळी त्या विधानसभा सदस्यांना मार्गदर्शनही करतील. तसेच सायंकाळी त्या राज्यातील काही मान्यवरांच्या भेटीगाठी घेतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com