Bharat Jodo Yatra: 'भारत जोडो यात्रेत' गोव्यातील हा नेता झाला सामील

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष, आमदार विजय सरदेसाई यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत पदाधिकाऱ्यांसह इंदोर येथे जाऊन राहुल गांधींसोबत सहभाग घेतला आहे.
Vijay Sardesai
Vijay Sardesai Dainik Gomantak

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष, आमदार विजय सरदेसाई यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत पदाधिकाऱ्यांसह इंदोर येथे जाऊन राहुल गांधींसोबत सहभाग घेतला आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांचे प्रभारी हे कर्नाटकचे नेते असल्यानेच म्हादईप्रश्नी दोन्ही बाजूंनी कर्नाटकच्याच भल्याचा विचार केला गेला असे विधान त्यांनी काही दिवसांपूर्वी केले होते.

(President of Goa Forward, MLA Vijay Sardesai has participated in Congress' Bharat Jodo Yatra)

Vijay Sardesai
Mopa Airport: PM मोदींच्या गोवा दौऱ्यावर शिक्कामोर्तब

ते पुढे म्हणाले, खरे तर मागच्या विधानसभा निवडणुकीत या एकाच प्रश्नावर काँग्रेसला भाजपला घरी पाठविण्याची संधी होती, पण काँग्रेस पक्षाने प्रभारी कर्नाटकी असल्याने बोटचेपी भूमिका घेतली आणि काँग्रेसने विजयाची संधी घालवली, असा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला होता.

भाजपने माझी प्रतिमा डागाळण्यासाठी करोडो रुपये खर्च केले: राहुल गांधी

यावेळी बोलताना भाजपने त्यांच्यावर केलेल्या वैयक्तिक हल्ल्यांबाबत राहुल गांधी म्हणाले की, या गोष्टींना ते आपले गुरू आणि मार्गदर्शक मानतात. ते म्हणाले, 'भाजपने माझी प्रतिमा खराब करण्यासाठी करोडो रुपये खर्च केले आणि त्यांनी माझी प्रतिमा निर्माण केली. लोकांना वाटते की ते माझ्यासाठी हानिकारक आहे परंतु प्रत्यक्षात ते माझ्यासाठी फायदेशीर आहे. कारण सत्य माझ्याजवळ आहे आणि सत्य लपवता येत नाही. माझी प्रतिमा डागाळण्यासाठी त्यांनी जेवढा पैसा खर्च केला, तेवढीच शक्ती ते मला देत आहेत.

Vijay Sardesai
Mopa Airport News: ‘मोपा’वर टॅक्सी व्यवसायासाठी स्थानिकांना संधी द्या' - सुदीप ताम्हणकर

भारत जोडो यात्रा ही माझ्यासाठी प्रायश्चित्त आहे: राहुल गांधी

राहुल पुढे म्हणाले, मला भारत जोडोचा प्रवास पूर्ण करायचा आहे. बाकी कशाचाही विचार नाही. ते म्हणाले, 'भारत जोडो यात्रेचा उद्देश संपूर्ण देशाला एक विशेष संदेश देणे हा होता. हा प्रवास पूर्ण करणे आणि भारतातील लोकांचे ऐकणे याशिवाय मी इतर कशाचाही विचार करत नाही

मी काँग्रेसचा विचार करत नाही, मी संघटनेचा विचार करत नाही, मी निवडणुकीचा विचार करत नाही, मी कशाचाही विचार करत नाही, मी भारताचा विचार करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com