Schedule Tribe Reservation: गोव्यात ‘एसटीं’ना राजकीय आरक्षण नसणे दुर्दैवी; किमान 5 जागा आवश्यक

संसदेच्या अनुसूचित जाती-जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष कीर्ती सोळंकी यांचे मत
Schedule Tribe Reservation
Schedule Tribe ReservationDainik Gomanak

Schedule Tribe Reservation: गोव्यात अनुसूचित जमातींना (एसटी) अजूनही राजकीय आरक्षण न मिळणे ही दुर्दैवी असल्याचे परखड मत अनुसूचित जाती-जमाती कल्याणासाठी नेमलेल्या संसदीय समितीचे अध्यक्ष कीर्ती प्रेमजीभाई सोळंकी यांनी व्यक्त केले. ही गोष्ट ऐकून मला आश्चर्य वाटले, असेही ते खेदाने म्हणाले.

या समितीने आज एसटीबहुल राय गावाला भेट दिली. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना या आरक्षणाबद्दल विचारले असता, आरक्षण हा त्यांचा संविधनिक अधिकार आहे. गोव्यातील ‘एसटीं’च्या टक्केवारीनुसार पाच मतदारसंघ त्यांच्यासाठी राखीव ठेवण्याची गरज आहे. राज्य सरकारने त्यासाठी त्वरित केंद्राकडे मागणी करावी, अशी सूचना आम्ही केली आहे. आमची समितीही ही बाब गंभीरपणे घेणार आहे, असे ते म्हणाले.

Schedule Tribe Reservation
Mahadayi Water Dispute: म्हादईप्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या साखळी गावातील मेगा रॅलीला परवानगी नाकारली...

सोळंकी यांच्या अध्यक्षतेखालील 30 खासदारांची समिती सध्या गोव्यात अभ्यास दौऱ्यावर असून कालपासून त्यांनी विविध अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना भेटून अनुसूचित जाती-जमातींच्या राज्यातील प्रश्नांवर चर्चा केली.

कीर्ती सोळंकी म्हणाले, हा आरक्षणाचा मुद्दा पहिल्यांदाच कुणीतरी आमच्या लक्षात आणून दिला आहे. आजपर्यंत हे आरक्षण का मिळाले नाही, हे कळणे कठीण आहे. गोवा सरकारने त्यासाठी जी प्रक्रिया करायला हवी होती, ती योग्य प्रकारे केली नसावी. निदान आता तरी सरकारने त्वरित पाऊले उचलावीत.

Schedule Tribe Reservation
Anjuna: ध्वनी प्रदूषणाबद्ल हणजुणेतील 'ला म्युझिका' कॅफेच्या मालक, व्यवस्थापकाविरोधात गुन्हा

गोव्यात अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांचे राहणीमान देशातील इतर भागांच्या तुलनेत बरेच चांगले आहे. तरीही या घटकांना शिक्षणात आणखी वर आणण्यासाठी प्रयत्न करता येण्यासारखे आहे. गोव्यात सर्वसाधारण साक्षरता 86 टक्के आहे. त्यामानाने एसटी वर्गाची साक्षरता 74 टक्क्यांच्या आसपास आहे. त्यांचे प्रमाण सर्वसाधारण टक्केवारीएवढे येण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज सोळंकी यांनी व्यक्त केली. राय गावासाठी डिजिटल लायब्ररी सुरू करता येणे शक्य आहे का त्याचा विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com