राष्ट्रपती रामनाथ कोविंद गोव्यात दाखल

हंस तळावर त्यांचे स्वागत गोवा राज्याचे राज्यपाल श्री. पी. एस. श्रीधरन पिल्लई (P. S. Sreedharan Pillai) यांनी केले.
President Ram Nath Kovind
President Ram Nath KovindDainik Gomantak

राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांचे आज दुपारी 3 वाजता दाबोळी हंस तळावर वायुसेनाच्या विशेष विमानाने आगमन झाले. हंस तळावर त्यांचे स्वागत गोवा राज्याचे राज्यपाल श्री. पी. एस. श्रीधरन पिल्लई (P. S. Sreedharan Pillai) यांनी केले. यावेळी त्यांच्या समवेत गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant), गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat), राज्य शिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो (Mavin Gudinho) उपस्थित होते.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आज ५ सप्टेंबर पासून तीन दिवसांच्या गोवा राज्य भेटीवर असून ७ सप्टेंबर पर्यंत ते गोव्यात असणार आहेत. या काळात उद्या सोमवारी ६ सप्टेंबर रोजी हंस तळावर नौदलाच्या तळाच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. त्यांचे वास्तव्य येथील राजभवनात असणार आहे.

President Ram Nath Kovind
Goa Election: इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे भाजपला सतावतेय बंडखोरांची भिती

दरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आगमन झाल्यानंतर तसेच त्यांचे स्वागत झाल्यानंतर ते खास हेलिकॉप्टरमधून दोनापावला येथे जायला रवाना झाले. आज राष्ट्रपतींचे स्वागत होणार असल्याने दाबोळी विमानतळ परिसर ते झूवारीनगरपर्यंत राष्ट्रीय महामार्गावर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडता कामा नये म्हणुन येथील दुकान व इतर व्यवसाय संपूर्ण बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे दुपारी दोन वाजल्यापासून संपूर्ण महामार्गावर शुकशुकाट होता. राष्ट्रपती दोनापावला जायला रवाना होताच वाहतूक तसेच या भागातील सर्व व्यवहार पूर्ववत सुरू करण्यात आले. पोलीस दुपारी एक वाजल्यापासून तैनात ठेवण्यात आले होते.

President Ram Nath Kovind
Goa: सत्तरीतील पूरग्रस्त कुटुंबे मदतीच्या प्रतीक्षेत

भारतीय नौदलाच्या हवाई उड्डाण विभागाला 'प्रेसिडेन्ट कलर्स'हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला असून, ६ रोजी भारतीय नौदलाच्या 'हंस' तळावर एका परेडमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल.याप्रसंगी टपाल खात्यातर्फे खास तिकीट जारी करण्यात येणार आहे. याप्रसंगी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह,मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, नौदलप्रमुख अडमिरल करमबीर सिंह व इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत.'प्रेसिडेंट कलर्स' हा सर्वोच्च पुरस्कार देशाच्या सुरक्षा व्यवस्थेच्या योगदानाबाबत संरक्षण यंत्रणांना देण्यात येतो. भारतीय सशस्त्र दलांमध्ये भारतीय नौदलला २७ मे १९५१ साली प्रेसिडेंट कलर्स पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतर नौदलातर्फे प्रेसिडेंट कलर्स पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांमध्येदक्षिणी नौदल कमांड, ईस्टर्न नेव्हल कमांड, वेस्टर्न नेव्हल कमांड, ईस्टर्न फ्लीट, वेस्टर्न फ्लीट, सबमरीन आर्म,आयएनएस शिवाजी आणि भारतीय नौदल अकादमी यांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com