गोवा मुक्तिदिनाच्या सोहळ्यासाठी राष्ट्रपतीच्या आगमनाने गोव्यातील रस्त्यांचे डांबरीकरण जोरात सुरू

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 15 डिसेंबर 2020

राजधानी पणजीतील आझाद मैदानावर असलेल्या स्मारकाच्या डागडुजीकडे अनेक वर्षे राज्य सरकारचे दुर्लक्ष झाले आहे मात्र या स्मारकाला राष्ट्रपती भेट देणार असल्याने सरकारने त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू केले आहे.

पणजी:  गोवा मुक्तिदिनाच्या पष्ठ्यब्दीपूर्ती सोहळ्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे गोव्यात येत आहेत. पणजी जिमखाना मैदानावर १९ रोजी सायंकाळी पाचशे जणांच्या उपस्थितीत गोवा मुक्तीच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्‍घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती पर्वरी येथे पत्रकार परिषदेत दिली.

राजधानी पणजीतील परेड मैदानावर होणाऱ्या गोवा मुक्तिदनाला उपस्थिती लावणार असल्याने डी. बी. मार्गावरील पदपथावरील दिव्यांची दुरुस्तीचे तसेच ते ज्या भागात भेट देणार आहेत त्या रस्त्यांचे डांबरीकरणही जोरात सुरू आहे. राजधानीतील इतर रस्त्यांच्या डागडुजीचे काम पावसाळा संपून दोन महिने उलटून गेले तरी अजून सुरू झालेले नाही.

मात्र राजधानी पणजीतील आझाद मैदानावर असलेल्या स्मारकाच्या डागडुजीकडे अनेक वर्षे राज्य सरकारचे दुर्लक्ष झाले आहे मात्र या स्मारकाला राष्ट्रपती भेट देणार असल्याने सरकारने त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू केले आहे.

आणखी वाचा:

गोवा मुक्तिदिन‌ आयोजन समितीच्या बैठकीवर  दिगंबर कामत यांचा बहिष्कार -

संबंधित बातम्या