वाघेरीवरील बेकायदा जंगलतोड रोखली

गुन्हा दाखल: मंत्री राणे यांनी घेतली दखल
Illegally cut trees in Goa
Illegally cut trees in GoaDainik gomantak

पणजी: वन संरक्षण कायद्याची पायमल्ली करून वाघेरी पायथ्याशी चालू असलेल्या जंगलाचा विद्‌ध्वंस बंद करण्याचे आदेश वनमंत्री विश्‍वजीत राणे यांनी आज, शनिवारी दिले. या प्रकरणात गुंतलेल्या सर्वांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना त्यांनी वन अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

‘वाघेरीवर नियम न पाळता मोठी जंगलतोड सुरू होती. यासंदर्भात वन खात्याने कोणतीही मान्यता दिलेली नाही किंवा या कामासाठी कोणतीही सनद मिळवलेली नाही. मी अशी अनागोंदी खपवून घेणार नाही’, अशी माहिती वनमंत्री विश्‍वजीत राणे यांनी दै.‘गोमन्तक’ला दिली.

Illegally cut trees in Goa
गोवा खाण लिलावासंदर्भात केंद्र सरकारचा हस्तक्षेप...

वाघेरी डोंगराच्या माथ्यावर जंगलांचा विद्‌ध्वंस करून रस्त्याचे जाळे निर्माण केल्याचे वृत्त दै. ‘गोमन्तक’नेच सर्वप्रथम प्रसिद्ध केले होते. विधानसभा निवडणुकीच्या काळात ते काम बंद राहिले होते. परंतु नुकतेच ते पुन्हा सुरू करण्यात आले. जेसीबी यंत्र लावून मोठ्या प्रमाणात जंगलतोडही सुरू होती. वाघेरी डोंगराची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली असून तेथे बांधकामे करण्यासाठीच रस्ते उभारले जात आहेत. 1997 मध्ये वाघेरीवरील सर्व्हे क्रमांक 102 चा समावेश खासगी जंगलक्षेत्रात करण्यात आला होता. या ठिकाणच्या वनक्षेत्राचा ऱ्हास करून प्रकल्प हाती घेता येत नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे हे जंगलक्षेत्र केंद्रीय वन पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने म्हादई अभयारण्यासाठी जे पर्यावरणीय संवेदनक्षम क्षेत्र म्हणून सूचित केले आहे, त्यात येत आहे. या जंगलात अनेक अधिसूचित वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे.

बेदरकारपणे जंगलतोड करून गस्तीपथक डोंगरावर येऊ नये यासाठी मोठमोठे दगड घालून रस्ता अडवला होता. मी वन अधिकाऱ्यांना जंगलतोडीपासून म्हादई वनक्षेत्राच्या संवेदनशील क्षेत्राचा केलेला विद्‌ध्वंस, अशा अनेक कलमांखाली गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले आहेत. वाघेरी क्षेत्र हे संवेदनशील असून ते कोणत्याही खासगी उद्योजकांपासून संरक्षित ठेवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.

- विश्‍वजीत राणे, वनमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com