सफरचंद खातोय भाव!

विलास ओहाळ
गुरुवार, 30 जुलै 2020

श्रावणात अनेकजण विविध पूजा अर्चा करतात, त्यासाठी फळफळावळ खरेदी केली जाते. परंतु बाजारात सफरचंद सोडून इतर फळांचे दर सध्या कमी जास्त होऊ लागले असल्याचे दिसून आले आहे. सफरचंद सध्या बाजारात २५० रुपये किलोने विकला जात आहे, तर इमारतीबाहेर सफरचंदाचे पाच ते सहानग आकारानुसार फिरते विक्रेते विकत आहेत.

पणजी

मागील काही दिवसांपासून सिताफळ, पेरू आणि डाळिंब यांचे दर १४० ते १६० किलोच्या दरम्यान होते, परंतु आज तिन्ही फळांची आवक बाजारात चांगली झाल्याने त्यांचे दर एकदम घसरल्याची माहिती येथील फळविक्रेत्यांनी दिली. तिन्हीही फळे १०० रुपये प्रति किलोने विकावी लागत होते. आवक वाढली असली तरी मूळ बाजारात त्या फळांची किंमत घसरलेली असल्याने हा दरातील फरक पडल्याचे काही फळ विक्रेत्यांनी सांगितले.

goa goa  goa

संपादन - संजय घुग्रेटकर

संबंधित बातम्या