आवक वाढल्याने मासळीच्या दरात घसरण

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

मासळीचे दर कमी झाल्याने ग्राहकांना एकाचवेळी विविध प्रकारच्या मासळींची खरेदी करणे शक्य झाले आहे. गेल्या महिन्यात मासळीचे दर आजच्या मासळीच्या दरांपेक्षा चढेच होते. सध्या बाजारात विविध प्रकारची मासळीची आवक वाढली आहे, त्यात इसवणबरोबरच बांगडे, वेर्ले, लेपो, सुंगटे (लहान) विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आले होते.

पणजी-  राजधानी पणजीतील मासळी मार्केटमध्ये मासळीची आवक वाढली आहे, त्याचा परिणाम सध्या मासळी दरावर झाल्याचा दिसून येतो. सुरमई तथा इसवणही मोठ्या प्रमाणात बाजारात येत असल्याने त्यांचे दर गेल्या महिन्याच्या तुलनेत निम्म्यावर आले आहेत. गेल्या महिन्यात सुरमई ६०० रुपये किलो होती, ती आता ३५० रुपये किलोने मिळू लागली आहे. 
मासळीचे दर कमी झाल्याने ग्राहकांना एकाचवेळी विविध प्रकारच्या मासळींची खरेदी करणे शक्य झाले आहे. गेल्या महिन्यात मासळीचे दर आजच्या मासळीच्या दरांपेक्षा चढेच होते. सध्या बाजारात विविध प्रकारची मासळीची आवक वाढली आहे, त्यात इसवणबरोबरच बांगडे, वेर्ले, लेपो, सुंगटे (लहान) विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आले होते. दर कमी झाल्याने मासे खवय्यांसाठी ही एक चांगली पर्वणीच आहे. नवरात्रीला काही दिवस बाकी असल्याने तोपर्यंत मासळीची मनमुराद आस्वाद लोकांना घेणे आता शक्य झाले आहे. पणजीतील अनेक लोक सकाळी ताजी मासळी मिळावी म्हणून मालीम जेटीवर खरेदीसाठी जाता. त्या ठिकाणी कमी दरात मासळी मिळत असल्याने अनेकजणांचा तेथील खरेदीला पसंती असते, परंतु सध्या मालीम जेटीप्रमाणेच मार्केटमधील मासळीचे दर असल्याने काहीजणांनी जेटीवर जाण्याचे टाळले असणार. 
मासळीचा प्रति किलो दर 
इसवण    ...................३५०
बांगडे    ....................२००
खेकडे (कुर्ले)    ...........३५०
वेर्ले (वाटा)    .............१००
सुंगटे (मोठे)    .............३००
लहान सुंगटे (वाटा)    .....१००
लेपो    ......................२००
मुड्डुशे    .....................३५०
ओला बोंबील.    ...........२००

संबंधित बातम्या