गोव्यात मोरजीच्या मिरचीला सोन्याचा भाव; किंमत ऐकुन व्हाल थक्क ...

गोव्यात मोरजीच्या मिरचीला सोन्याचा भाव; किंमत ऐकुन व्हाल थक्क ...
Morjim Chilli Rate.jpg

मोरजी: गावठी मिरच्यांनी जनतेच्या डोळ्यात पाणी आणले आहे. 900 ते 1000 रुपये किलो प्रमाणे मिरच्यांच भाव गगनाला पोचला आहे. इतिहासात प्रथमच मिरच्यांच्या दराने उच्चांक गाठलेला आहे. त्यामुळे जनतेच्या डोळ्यातून मिरची खाण्यापूर्वीच पाणी आणले आहे. (The price of Morji's village chilli has gone up.)

मांद्रे मतदारसंघातील हरमल, मांद्रे आणि मोरजी (Morjim) या भागातील गावठी मिरच्यांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या भागात मोठ्या प्रमाणात गावठी मिरच्यांचे पीक स्थानिक शेतकरी घेत आहेत. प्रथमच शेतकऱ्यांच्या कष्ठाला भाव आलेला आहे. मात्र, सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यात अश्रू आणले आहे. या भागातील मिरच्यांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. वाढती मागणी लक्षात घेऊन शेतकरी दरवर्षी आपल्या पारंपरिक शेतात मिरच्यांची लागवड करत असतात.

पूर्वी मिरच्या 300 ते 350 रुपये किलोप्रमाणे उपलब्धता होत्या. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरच्यांनी किंमतीने उच्चांक गाठला आहे. मोठ्या प्रयासाने शेतकरी मिरच्यांची लागवड करत असतात. मांद्रे, मोरजी आणि हरमल या गावातील मिरच्या खूपच प्रसिद्ध आहेत. दर्जेदार मिरच्या या भागात उपलब्ध आहेत.

हिरव्याही मिरच्यांची लागवड
हिरव्या मिरचीच्या मध्ये अ, ब, क आणि ई जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात; तसेच कॅल्शिअम, फॉस्फरस ही खनिजद्रव्ये मोठ्या प्रमाणात असतात. त्याचबरोबर प्रथिने, क्षारही असतात. मिरचीचा आहाराबरोबरच औषधातही मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. 

मिरची (Chilli) पिकास वाढीच्या सुरवातीच्या काळात उष्ण व दमट, तर पक्वता अवस्थेत कोरडे हवामान चांगले मानवते. मिरची पिकाच्या वाढीसाठी 25 ते 28 अंश सेल्सिअस तापमान आदर्श असते. अतिथंड हवामान (दहा सेल्सिअस खाली) मिरचीला मानवत नाही. मिरचीची लागवड खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामांत चांगल्या प्रकारे करता येते. खरिपासाठी मे - जूनमध्ये रोपे तयार करून त्यांची जून - जुलैमध्ये पुनर्लागण; रब्बीसाठी सप्टेंबर - ऑक्‍टोबरमध्ये रोपे तयार करून ऑक्‍टोबर - नोव्हेंबरमध्ये पुनर्लागण व उन्हाळी हंगामासाठी डिसेंबरमध्ये रोपे तयार करून त्यांची जानेवारी - फेब्रुवारीमध्ये पुनर्लागण करता येते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com