Fire in Goa | PM Narendra Modi | Rajnath Singh
Fire in Goa | PM Narendra Modi | Rajnath Singh Dainik Gomantak

Fire in Goa: पंतप्रधान मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी घेतली गोव्यातील आगींच्या घटनांची माहिती

वनमंत्री विश्वजीत राणे यांची माहिती; वन मंत्रालयाने सोपवला अहवाल

Fire in Goa: गोव्यात गेल्या काही दिवसांमध्ये जंगलात, डोंगरावर आगींच्या घटनांचे सत्र सुरू आहे. अगदी दक्षिणेपासून उत्तर गोव्यातील अभयारण्यांमध्येही जंगलात आगीच्या घटना घडल्या आहेत, आणि अजूनही आगींची माहिती समोर येत आहे.

या आगींच्या घटनांनी राज्यात खळबळ माजली असतानाच आता केंद्र सरकार स्तरावरही या आगींची दखल घेतली गेली आहे.

Fire in Goa | PM Narendra Modi | Rajnath Singh
Colvale Jail: कोलवाळ कारागृहात पोलिसांचा आठवड्यात दुसऱ्यांदा छापा; 8 मोबाईल फोन जप्त

गोव्यातील अलीकडच्या काळातील आगींच्या घटनांबाबतचा सविस्तर अहवाल वन मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या कार्यालयांना पाठवला आहे, अशी माहिती राज्याचे वनमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे.

दरम्यान, सध्या आपल्याला दोन हेलिकॉप्टर्स देण्यात आलेली आहे. त्याद्वारे जंगलातील आग विझवण्याचा प्रयत्न वनखाते करत आहे. प्राधान्यक्रम ठरवून त्यांचा वापर केला जात आहे, असेही विश्वजीत राणे यांनी सांगितले.

Fire in Goa | PM Narendra Modi | Rajnath Singh
Goa Fire: म्‍हादई अभयारण्‍यात हेलिकॉप्‍टरच्‍या फेऱ्या वाढवल्या; आग कर्नाटकच्या दिशेने...

दरम्यान, गुरूवारीच वनमंत्री विश्वजीत राणे जंगलातील आगींच्या घटनांबाबत अजिबात रिस्क घेणार नाही, असे सांगितले होते. राणे म्हणाले होते की, या आगीच्या घटनांमध्ये वन्यजीव, वनस्पतींचे नुकसान झालेले नाही.

काणकोन ते सत्तरी या भागातील आगीच्या घटनांची हवाई पाहणी केली आहे. आग विझविण्यासाठी अतिरिक्त पथके नियुक्त केली आहेत. 700 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. यात स्थानिकांनाही सहभागी करून घेतले आहे. केंद्र सरकारही मदत करत आहे.

आगींच्या घटनांची सविस्तर चौकशी करू. थेट कारवाईचे, अटकेचे आदेश दिले आहेत. जंगलात कुणालाही प्रवेश दिला जात नाही. नागरीकांनाही वणव्याला कारणीभूत ठरेल अशी कोणतीही कृती करू नये.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com