९ कोटी शेतकऱ्यांना आज १८ हजार कोटी

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 25 डिसेंबर 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी १२ वाजता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेखाली शेतकऱ्यांना पुढचा हप्ता देणार आहेत.

पणजी:  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी १२ वाजता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेखाली शेतकऱ्यांना पुढचा हप्ता देणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हा कार्यक्रम होत  आहे . ज्यात राज्यातील शेतकरीही विविध ठिकाणांहून सहभागी होत आहेत. दरम्यान, भाजपचे सर्व खासदार, आमदार, पक्षाच्या इतर नेत्यांनी या कार्यक्रमाला गट पातळीवर हजर आहेत, 

किसान योजनेखाली ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या एकूण १८ हजार कोटी रुपये जमा केले जाणार आहेत. आज पेडणे येथील पेडणे तालुका सहकारी सोसायटी मधील कार्यक्रमास मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित  आहेत.

पीर्ण येथील कार्यक्रमाला भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे आणि थिवीचे आमदार निळकंठ हळर्णकर, डिचोली येथील कार्यक्रमास विधानसभा सभापती राजेश पाटणेकर,पाळी-साखळी येथील कार्यक्रमास केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, धारबांदोडा-कुळे येथील कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर, केपे येथील कार्यक्रमास उपमुख्यमंत्री तथा कृषीमंत्री  चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर, सांगे येथील कार्यक्रमास आमदार सुभाष शिरोडकर, भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष वासुदेव गावकर, माजी आमदार सुभाष फळदेसाई, तर काणकोण येथील कार्यक्रमास विधानसभेचे उपसभापती इजिदोर फर्नांडिस उपस्थित आहेत.

आणखी वाचा:

‘‘न दैन्यं न पलायनम्...3 वेळा  पंतप्रधान होऊनही कायम अर्जुनाच्याच भूमिकेत राहिलेला नेता -

संबंधित बातम्या