कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद

दैनिक गोमंतक
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

आजच्या बैठकीत महाराष्ट्र, केरळ, दिल्ली, बंगाल, कर्नाटक, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या सर्वांत वाईट कोविडग्रस्त राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. तसेच गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही उपस्थि होते.

 

नवी दिल्ली : आजच्या बैठकीत महाराष्ट्र, केरळ, दिल्ली, बंगाल, कर्नाटक, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या सर्वांत वाईट कोविडग्रस्त राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. तसेच गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही उपस्थि होते.

कोरोनाच्या वाढत्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील काही राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच अजुनही कोरोनाबाबत जनजागृतीची गरज असल्याच मोदींनी सांगितले. याशिवाय व्हॅक्सिनच्या सध्यपरिस्थितीबाबतही त्यांनी माहिती दिली. कोरोना व्हॅक्सिन च्या वितरणाबाबत सांगतांना मोदी म्हणाले की, "लसिकरणाचा अनुभव भारतासारखा इतर कोणत्याच देशाकडे नाही."

राज्यांनी कोणत्याही प्रकारची हलगर्जी होऊ देऊ नये असा इशारा देत पंतप्रधान मोदींनी सकारात्मक दर पाच टक्क्यांपेक्षा कमी आणि मृत्यू दराला 1 टक्क्यांपेक्षा कमी करण्याच्या दिशेने कार्य करण्यास राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले. "प्रसारण कमी करण्यासाठी आपल्या प्रयत्नांना वेग देणे आवश्यक आहे " चाचणी, पुष्टीकरण, संपर्क ट्रेसिंग आणि डेटा यांना प्रथम प्राधान्य दिले जावे," असेही मोदी म्हणाले.

आणखी वाचा:

संबंधित बातम्या