पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक या़ंची विचारपूस

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जानेवारी 2021

पंतप्रधान  नरेंद्र  मोदी  यांनी  आज अपघातात  जखमी  झालेले  केंद्रीय  आयुष  राज्यमंत्री श्रीपाद  नाईक  या़ंच्याशी  दूरध्वनीवरून  संवाद  साधला. मोदींनी  नाईक 
यांच्या  तब्येतीची  चौकशी  केली  आणि   त्यांना  काळजी  घेण्याचा  सल्ला  दिला. 

  पणजी:  पंतप्रधान  नरेंद्र  मोदी  यांनी  आज अपघातात  जखमी  झालेले  केंद्रीय  आयुष  राज्यमंत्री श्रीपाद  नाईक  या़ंच्याशी  दूरध्वनीवरून  संवाद  साधला. मोदींनी  नाईक 
यांच्या  तब्येतीची  चौकशी  केली  आणि   त्यांना  काळजी  घेण्याचा  सल्ला  दिला. 
श्रीपाद  नाईक  यांनी आपल्याला  कालच्या  तुलनेने  आज  अधिक  बरे  वाटते  आहे, असे सांगून  पंतप्रधानांचे  आभार  मानले.

दरम्यान, उप  राष्ट्रपती  श्री. व्यंकय्या  नायडू  यांनी  आज  सकाळी  श्री.  श्रीपाद  नाईक यांची  जीएमसी  इस्पितळात  भेट  घेऊन  त्यांच्या  तब्येतीची  विचारापूस  केली.
त्यांच्या  सोबत  गोव्याचे  मुख्यमंत्री डाॅक्टर प्रमोद सावंत, गोवा  प्रदेश  भाजपा  अध्यक्ष सदानंद  शेट  तानावडे,  सतीश  धोंड  आणि  जीएमसीचे  डीन  डाॅ. बांदेकर  होते.

धर्मस्थळला  एका  कार्यक्रमाला  उपस्थित राहून  सोमवार  ११  रोजी  गोव्यात  परतत असताना  गोकर्ण  नजीक  हिल्लूर  गावात  श्रीपाद  नाईक  यांच्या  गाडीला  भीषण  अपघात  होऊन  त्यात  त्यांच्या   पत्नी  सौ.  विजया  नाईक   यांना   मरण  आले. 
देशाचे  संरक्षणमंत्री  राजनाथसिंग  यांनी  अपघाताचे  वृत्त  कळताच  मंगळवारी  गोवा गाठून   श्रीपाद  नाईक  भेट  घेतली  होती.

संबंधित बातम्या