गोव्यात पंतप्रधान वन धन योजना; महिलांच्या स्वयंसहाय्य गटांना होणार लाभ

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 7 जानेवारी 2021

गोव्यात पंतप्रधान वन धन योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

पणजी : गोव्यात पंतप्रधान वन धन योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत आदिवासी कल्याण खात्याच्या वतीने फूड पार्क उभारण्याचा प्रस्ताव आहे. महिला स्वयंसाह्य गटांच्या उत्पादनांची विक्री या पार्कमध्ये होईल.

त्यासाठी संजविनी सहकारी साखर कारखान्याची जमीन घेण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी दिली. मंत्रालयात आज या खात्याची बैठक पार पडली.  पंतप्रधान आदिवासी वन धन योजनेवर आदिवासी खात्याचे काम सुरु असून, महिलांच्या स्वयंसहाय्य गटांना त्याचा लाभ होणार असल्याचे वृत्त नुकतेच दैनिक गोमन्तकने प्रसिद्ध केले होते.

आणखी वाचा:

चांदरच्या राज्य महामार्गावरून राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न -

संबंधित बातम्या