ब्रिटीश महिला पर्यटकावर बलात्कार करणाऱ्या कैद्यास गोव्यात अटक!

ब्रिटीश महिला पर्यटकावर बलात्कार करणाऱ्या कैद्यास गोव्यात अटक!
Prisoner arrested for raping British woman tourist in Goa

म्हापसा: कोलवाळ कारागृहातून पसार झालेल्या रामचंद्र यल्लाप्पा याला होस्कोटे-कर्नाटक येथे पोलिसांनी संयुक्त कारवाई करून पकडले. कर्नाटक, आंध्रप्रदेश व तमीळनाडूत त्याचा शोध घेण्यात येत होता. त्याच्यावर पाळोळे येथे ब्रिटीश महिला पर्यटकावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. कारागृहातून पळून जाण्याची त्याची ही दुसरी वेळ होती. पोलिसांच्या गुन्हे शाखेने व म्हापसा पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी त्याला पकडण्याची कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 सप्टेंबर 2020 रोजी तो कोलवाळ कारागृहातून पळून गेला होता. त्याआधी तो जून 2019 मध्ये पोलिस कोठडीतून पळून गेला होता. त्यानंतर त्याला बंगळूर येथे पकडण्यात आले होते. आता त्याने पळून जाण्यासाठी पावसाळी दिवस निवडला. कोणाचे तरी व्हरांड्यात सुकत घातलेले कपडे पळवून ते परीधान केले. त्यानंतर पोलिसांनी पकडू नये यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, तमीळनाडू, आंध्रप्रदेश आणि तेलगंण राज्यात तो फिरत राहिला. जून्या साथीदारांच्या मदतीने तो चालकाचे काम करून उदरनिर्वाह करत होता. एका जागी तो जास्त दिवस काम करत नव्हता. त्याचे कुटुंबिय कर्नाटकातील होसूर येथे राहतात.

त्या सगळ्यांवर पाळत ठेऊन रामचंद्रचा ठावठिकाणा शोधण्यात आला. पोलिसांची पथके तीन राज्यांत रवाना करण्यात आली. अखेर तो होस्कोटे-कर्नाटक येथे सापडला. त्याच्यावर चोरीचेही गुन्हे दाखल आहेत. पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना व उत्त्क्रीश्त प्रशून यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राहूल परब, अनंत गावकर, तुषार लोटलीकर, उपनिरीक्षक सुनील, किरण नाईक आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com