कोलवाळ कारागृहातील कैदी इस्पितळातून फरार

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 30 डिसेंबर 2020

गोव्याचे मध्यवर्ती कारागृह असलेल्या कोलवाळ येथून कैदी पसार झाला आहे. विवेक कुमार गोतम उर्फ आर्यन असे या पसार झालेल्या कैद्याचे नाव असून तो म्हापसा जिल्हा इस्पितळातून फरार झाला.

पणजी- गोव्याचे मध्यवर्ती कारागृह असलेल्या कोलवाळ येथून कैदी पसार झाला आहे. विवेक कुमार गोतम उर्फ आर्यन असे या पसार झालेल्या कैद्याचे नाव असून तो म्हापसा जिल्हा इस्पितळातून फरार झाला.

 
कारागृहात आरोपीला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्याला इस्पितळात दाखल करण्यात आणले होते. त्यादरम्यान त्याच्या दोन साथीदारांनी पिस्तुलातून गोळीबार करून व मिरची पावडरचा स्प्रे मारून समोरच्यांमध्ये भय निर्माण केला आणि आरोपीला घेऊन ते पसार झाले. पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली असून सर्व सीमांवर अलर्ट जारी करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या