कोरोनाच्‍या धास्‍तीने कैद्याने केले असावे पलायन?

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

एरव्ही संशयित हेमराज भारद्वाज हा कचरा टाकण्याचे काम करत असे. मात्र त्याने पलायन करण्याचा प्रयत्न केला नव्हता. त्यामुळे तो कोरोना आजाराला घाबरून पलायन केल्याची चर्चा कारागृहात सुरू होती.

पणजी: सध्या कारागृहात कोरोनाबाधित कैद्यांची संख्या पन्नासच्या आसपास पोहोचली आहे व त्यामध्ये कच्चे कैद्यांचा अधिक समावेश आहे. 

कोरोनाग्रस्त कैद्यांना अलगीकरण करण्यात आले तरी त्याचे पालन होत नाही. त्यामुळे काही कैद्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. एरव्ही संशयित हेमराज भारद्वाज हा कचरा टाकण्याचे काम करत असे. मात्र त्याने पलायन करण्याचा प्रयत्न केला नव्हता. त्यामुळे तो कोरोना आजाराला घाबरून पलायन केल्याची चर्चा कारागृहात सुरू होती. 

शिक्षा भोगत असलेल्या काही आरोपींना कोविड - १९ च्या पार्श्‍वभूमीवर ठराविक काळासाठी कारागृहाबाहेर सोडण्यात आले आहे. कच्चे कैदी असलेल्यांनी ठराविक काळासाठी मोकळीक द्यावी, अशी विनंती करूनही ती फेटाळण्यात आली आहे. कोरोना कारागृहात पोहोचून त्याचा संसर्ग वाढू लागल्याने कैदी भयभीत झाले आहेत. 

संशयित भारद्वाजला पेडणे पोलिसांनी २९ जानेवारी २०२० रोजी ड्रग्जप्रकरणी अटक केली होती. त्याच्याकडे महागडा किंमतीचा ड्रग्ज सापडल्याने त्याला जामीन मिळू शकला नव्हता. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. मात्र कोविड महामारीमुळे न्यायालयातील सर्व खटल्यांवरील सुनावणी तात्पुरता बंद ठेवून काही महत्त्वाच्या प्रकरणामध्ये सुनावणी घेतली जात आहे. कारागृहातून पळालेला कच्चा कैदी हेमराज भारद्वाज हा ज्या ठिकाणी वास्तव्यास होता तेथे तो येऊ शकतो याचा अंदाज बांधून त्या परिसरात साध्या वेशात पोलिस तैनात करण्यात आले होते. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या