Sanguem नगराध्यक्षपदी प्रीती नाईक यांची बिनविरोध निवड

Sanguem: प्रीती नाईक यांची निवडणूक अधिकारी नीलेश धायगोडकर यांनी बिनविरोध निवड घोषित केली.
Sanguem
SanguemDainik Gomantak

सांगे नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी प्रीती प्रसाद नाईक यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी नीलेश धायगोडकर यांनी केली. यावेळी सर्व नगरसेवक, पालिकाधिकारी भगवंत करमली व्यासपीठावर उपस्थित होते.

श्वेता नाईक तारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदासाठी प्रीती नाईक यांचा एकमेव अर्ज आल्याने सकाळी अकरा वाजता निवडणूक अधिकारी या नात्याने नीलेश धायगोडकर यांनी बिनविरोध निवड घोषित केली.

Sanguem
Panjim Smart City| गटारे तुंबतात त्याचे काय? मडकईकरांचा सवाल

यावेळी श्वेता नाईक तारी, मेशु डिकॉस्ता, संतिक्षा गडकर, अर्चना गावकर, रुमाल्डो फर्नांडिस, इकबाल सय्यद, संगमेश्वर नाईक, फौजिया शेख हे नगरसेवक उपस्थित होते. पालिका अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेविका श्वेता तारी म्हणाल्या, की आपण आपल्या कालावधीत जसे शक्य झाले त्यापद्धतीने पालिका मंडळ चालविले. याच पद्धतीने चांगले प्रशासन देण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन करून पुढील वाटचालीस नूतन नागराध्यक्षांना शुभेच्छा दिल्या.

Sanguem
Circus in Goa : गोव्यात 16 सप्टेंबरपासून रंगणार रॅम्बो सर्कस

उपनगराध्यक्ष केरोज क्रूज यांनी पालिका मंडळाने केलेल्या करारानुसार नवीन नगराध्यक्षाची निवड करण्यात आली असून आजपर्यंत पालिकेतील सर्व नगरसेवक एकसंध राहून विकासकामे राबवीत आहे. त्याच पद्धतीने यापुढेही सर्वजण एकसंघ राहून पालिका क्षेत्राचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून नवीन नगराध्यक्षांना शुभेच्छा दिल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com