थिवीतील रेशनकार्डधारकांची अखेर समस्या अखेर मिटली

प्रतिनिधी
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

कानसा-थिवी येथील देवदत्त धोंड यांच्या मालकीच्या स्वस्त धान्य दुकान क्रमांक ५७चा परवाना नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याने निलंबित केल्यानंतर सध्या कोप्रेवाडा, थिवी येथील धुमस्कर हॉस्पिटलसमोरील अपर्णा कांबळी यांच्या दुकान क्रमांक ६८मध्ये तेथील ग्राहकांची पर्यायी सोय खात्याने लोकांची समस्या सध्या मिटलेली आहे.

म्हापसा: कानसा-थिवी येथील देवदत्त धोंड यांच्या मालकीच्या स्वस्त धान्य दुकान क्रमांक ५७चा परवाना नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याने निलंबित केल्यानंतर सध्या कोप्रेवाडा, थिवी येथील धुमस्कर हॉस्पिटलसमोरील अपर्णा कांबळी यांच्या दुकान क्रमांक ६८मध्ये तेथील ग्राहकांची पर्यायी सोय खात्याने लोकांची समस्या सध्या मिटलेली आहे.

गणेशचतुर्थी उत्सव अगदीच काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, लोकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी उत्तमोत्तम ग्राहकसेवा देण्यासाठी दुकानमालक प्रयत्नशील असल्याचे स्थानिक ग्राहक व सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले. दरम्यान, यासंदर्भात संपर्क साधला असता, या महिन्यात आतापर्यंत सुमारे सहाशे कार्डधारकांनी आपल्या दुकानानातून धान्याची उचल केली आहे, असे अपर्णा कांबळी यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

कानसा-थिवी येथील धोंड यांच्या ५७ क्रमांकाच्या दुकानातील ग्राहकांनी धान्याचा साठा मिळवण्यासाठी १ ऑगस्टपासून आगामी तीन महिन्यांसाठी कोप्रेवाडा थिवी येथील दुकान क्रमांक ६८ मध्ये संपर्क साधावा, असे खात्याने कळवले होते. त्यामुळे सध्या अपर्णा कांबळी यांच्या दुकानात स्थानिक ग्राहकांनी गर्दी केली असून, त्यांच्याकडून चांगल्यापैकी सेवा मिळत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक कार्डधारकांनी व्यक्त केली आहे.

थिवी येथील धोंड यांच्या मालकीचे स्वस्त धान्य दुकान क्रमांक ५७ नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याने १ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. स्थानिक लोकांच्या तक्रारीनुसार खात्याच्या वतीने त्या दुकानासंदर्भातील चौकशी सध्या सुरू आहे. त्या दुकानाच्या मालकाने पीओएस मशीनचा वापर करण्यास नकार दिल्याने खात्याने त्या दुकानाचा परवाना निलंबित केला आहे.

संबंधित बातम्या

Tags