बार्देशमध्ये बेवारस गुरांचा त्रास वाढला

वार्ताहर
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

बार्देश तालुक्यातील अनेक ठिकाणी सध्या बेवारस गुरे मोठ्या प्रमाणात दिसून येत असून, रात्रीच्यावळी ही गुरे रस्त्यावरच बसून राहत असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता वाढली आहे.

कुचेली: बार्देश तालुक्यातील अनेक ठिकाणी सध्या बेवारस गुरे मोठ्या प्रमाणात दिसून येत असून, रात्रीच्यावळी ही गुरे रस्त्यावरच बसून राहत असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता वाढली आहे. म्हापसा शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यावरही गुरे दिसत असून, या गुरांमुळे वाहनचालक व पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

ग्रामीण भागापैकी कुचेली, शिवोली, पर्रा, मयडे, थिवी, करासवाडा आदी भागातही मोकाट जनावरे दिसून येतात. वाहने येऊनही ही जनावरे रस्त्यावरून हटत नसल्या तायाचा त्रास वाहनचालकांना होत आहे. काहीवेळा गाडी थांबवून गुरांना हटकावे लागत असल्याचे वाहनचालकांनी सांगितले.

काही गुरांचे मालक केवळ दूध काढण्यापुरते या गुरांचा वापर करतात, अन्यथा त्यांना रस्त्यावरच सोडून देण्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे बेवारस गुरांना सद्यःस्थितीत कोंडवाढ्यात ठेवण्याची गरज आहे.

संबंधित बातम्या