मोपा विमानतळावर मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांची गैरसोय

Mopa Airports Jobs : मोपा विमानतळावर नोकरीच्या मुलाखती सुरू आहेत. दरम्यान मुलाखतींसाठी बोलावण्यात आलेल्या उमेदवारांना परत पाठविण्यात आल्यामुळे उमेदवारांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याचे दिसून आले.
मोपा विमानतळावर मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांची गैरसोय
Mopa Airports Jobs Dainik Gomantak

मोपा विमानतळाचा मुद्दा गोव्यातील प्रमुख मुद्दयांपैकी एक आहे. विमानतळासाठी ग्रामस्थांचा विरोध असला तरी आता मोपा विमानतळ कार्यान्वित होण्यासाठी प्रारंभ झाला आहे. विमानतळावर असणाऱ्या नोकऱ्यांमध्ये राज्यातील स्थानिक लोकांना मिळण्यासाठी गोव्यातील नागरिकांकडून प्रयत्न केले आहेत.

मोपा विमानतळावर नोकरीच्या मुलाखती सुरू आहेत. दरम्यान मुलाखतींसाठी बोलावण्यात आलेल्या उमेदवारांना परत पाठविण्यात आल्यामुळे उमेदवारांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याचे दिसून आले. यावेळी मोठ्या प्रमाणात नोकरीच्या इच्छेने उमेदवारांची उपस्थिती होती. मेल आल्यावर आता या म्हणून उमेदवारांना बाहेर पाठवण्यात आले. काहीना संध्याकाळ झाली तरी मेल आलाच नसल्याचे चित्र दिसून आले.

Mopa Airports Jobs
पेडा-बाणावलीत आज सांजाव पारंपरिक पद्धतीने साजरा

दरम्यान, मोपा विमानतळ प्रकल्पात आतापर्यंत दिलेल्या सुमारे पाचशे नोकऱ्या केवळ पेडणे तालुक्यातील व्यक्तींना दिल्या आहेत का अशी चर्चा सध्या पेडणे तालुक्यात सुरू आहे. त्या नोकऱ्या बहुतांश प्रमाणात पेडणे तालुक्याच्या बाहेरील लोकांनाच देण्यात आल्याचा दावा या विमानतळासाठी जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com