Morjim Land Issue: मोरजी बनतेय समस्यांचे आगर; अतिक्रमणामुळे मोरजीचे अस्तित्व धोक्यात

समन्वयाचा अभाव : आमदार आरोलकरांशी पंचायत करणार चर्चा
 MLA jit arolkar
MLA jit arolkar Gomantak Digital Team

Morjim Land Issue: मोरजी पंचायत क्षेत्रात दिवसेंदिवस समस्या वाढत आहेत. या समस्या सोडवण्यासाठी आता स्थानिक आमदार जीत आरोलकर, स्थानिक जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर, मोरजी पंचायत मंडळ, नागरिकांनी एकत्रित येऊन या समस्या सामोपचाराने सोडवण्याची गरज आहे. अन्यथा अतिक्रमणामुळे मोरजीचे अस्तित्व धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त होत आहे.

नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत या समस्यांवर मंथन करण्यात आले. या चर्चेअंति असे लक्षात आले, की मोरजी पंचायत मंडळ आणि विद्यमान आमदार जीत आरोलकर या दोघांमध्ये ताळमेळ नाही. राजकीय भेदभावामुळे दोन्ही लोकप्रतिनिधी एकत्रित येत नाहीत.

 MLA jit arolkar
Morjim News : मोरजी डोंगर-माळरानावरील जमिनी परप्रांतीयांच्‍या घशात!

त्यामुळे विकास कामांना खो बसत असून त्यातूनच समस्या निर्माण होतात. आणि त्यामुळे बेकायदेशीर गोष्टी करणाऱ्यांचे फावते आहे. त्यामुळे पंचायत मंडळाने आमदार आरोलकर यांची भेट घेऊन मोरजी गावच्या हितासाठी विकासासाठी प्रयत्न करावे, असा निर्णय झाला.

पार्किंग व्यवस्था, अडविलेल्या पारंपारिक पायवाटा, रस्त्यांची दुरवस्था, रस्त्यावरील अतिक्रमण, ओव्हाळ नाल्यावरही अतिक्रमण, मद्याची दुकाने उशिरापर्यंत सुरू असणे, बांधकामांची सुरक्षा भिंत, यासह अनेक विषयांवर मोरजी पंचायत मंडळ ग्रामस्थांनी चर्चा केली होती.

 MLA jit arolkar
Morjim Power Outage : विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण; वीजप्रवाह सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस बिघाडच

पार्किंगचे तीन तेरा

मोरजीत अनेक व्यावसायिक बांधकामे झाली. सुरू आहेत. मात्र, ते करताना वाहन पार्किंगच्या मुख्य मुद्द्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे बहुतांश ठिकाणी वाहने रस्त्यावरच उभी असतात. यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. मध्यंतरी नो पार्किंग झोन अंतर्गत कारवाई करण्यात येत होती. पण ती कारवाई थंडावली असून वाहनधारकही नियमांचे पालन करण्यास टाळाटाळ करतात.

 MLA jit arolkar
Morjim Water Shortage Issue: पाण्यासाठी 3-4 किमी पायपीट, स्मार्ट गोव्यातील भीषण चित्र

रस्ते अडविण्याचा प्रकार सुरू : पारंपरिक पायवाटांसह मुख्य रस्ते अंतर्गत रस्त्याला जोडणारे रस्ते अडवले जाण्याचा प्रकार घडत आहे. मधला वाडा ते रसाळ किनारी भागात जाणारा रस्ता सध्या वादग्रस्त स्थितीत बनला आहे. कान्नाईक वाडा येथे मागील वीस वर्षांपासून डांबरीकरण केलेला रस्ताही अडवण्याचा प्रकार झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com