आत्मनिर्भर भारत कार्यक्रमाखाली केरी सत्तरी पंचायत मंडळाशी बैठक

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत व गोवा सरकारच्या स्वयंपूर्ण गोवा या कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका आपल्या इतर अधिकाऱ्यासवेत केरी सत्तरीत येऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या.

पर्ये : केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत व गोवा सरकारच्या स्वयंपूर्ण गोवा या कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका आपल्या इतर अधिकाऱ्यासवेत केरी सत्तरीत येऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या.

नुकताच त्यांनी केरी सत्तरी येथील ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन पंचायत सरपंच व इतर पंचायत सदस्य यांच्या सोबत बैठक घेतली व गावाच्या एकंदरीत विकासासंबंधी चर्चा केली. यावेळी या कार्यक्रमाअंतर्गत केरी पंचायतीसाठी नियुक्त केलेल्या मत्स्य अधीक्षक अधिकारी  मेघा केरकर, वाळपईचे मामलेदार दशरथ गावस, वाळपई विभागीय कृषी साहाय्यक अधिकारी दत्तप्रसाद जोग, पंचायत सचिव लक्ष्मण नाईक, तलाठी तनुजा राणे, केरी ग्रामपंचायत सरपंच गोविंद गावस, उपसरपंच नमिता गावस, पंच सदस्य लक्ष्मण गावस, लक्ष्मण पांडुरंग गावस, दाऊद सय्यद, ज्ञानेश्वरी शेटकर, रुक्मिणी गावस आदी उपस्थित होते.

यावेळी केरी पंचायत सदस्यांनी केरीतील समस्याची माहिती दिली. केरीत जमीन मालकीचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली. केरीतील बऱ्याच जमिनीची जमीन कसवणाऱ्यांना मालकी नसल्याने त्यांना शेतीसाठी सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही असे सांगितले. त्याचबरोबर शेती करायला गेल्यास जंगली प्राण्याकडून नासाडी करून नुकसान केली जाते त्यामुळे शेतकरी शेती करण्यास पुढे येत नाहीत अशा समस्या मांडल्या. त्याचबरोबर गावातील रस्त्याच्या समस्या, सुरक्षित पिण्याच्या पाण्याची समस्या, युवकांसाठी खेळाचे मैदान, स्मशानभूमी आदी समस्या अधिकाऱ्यांपुढे मांडल्या.

यावर मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी आर. मेनका यांनी जंगली प्राण्यांच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी पुढील बैठकीत वन खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात येणार असल्याचे सांगितले व इतर समस्या बद्दल त्या त्या खात्यातील अधिकाऱ्यांना कळवले जाईल असे आश्वासन दिले.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी अधिकारी व पंचायत सदस्य यांची समिती बनवून गावाचा स्वयंपूर्ण विकास होण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार असल्याचे सांगितले. वाळपई मामलेदार दशरथ गावस यांनी पंचायत सदस्यांना विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. प्रमुख अधिकारी मेघा केरकर यांनी विविध योजनांची माहिती दिली तर कृषी सहाय्यक अधिकारी दत्तप्रसाद जोग यांनी कृषी खात्याच्या योजनांची माहिती दिली. यानंतर या अधिकाऱ्याने अंजुणे धरण परिसर व इतर काही काही रोजगार निर्मिती शक्य असलेल्या जागांची पाहणी केली.

संबंधित बातम्या