Panaji Smart City: पावसाळ्यात राजधानी पणजीत उद्भवणार समस्या; महापौरांनीच व्यक्त केली चिंता

स्मार्ट सिटीच्या कामांवर निर्णय घेण्याचे अधिकार नसल्याचे स्पष्टीकरण
Mayor Rohit Monserrate
Mayor Rohit MonserrateDainik Gomantak

Panaji Smart City: शहरातील स्मार्ट सिटीच्या कामांवर निर्णय घेण्याचे अधिकार महापालिकेकडे नाहीत. त्याचा फटका राजधानी पणजीला बसेल. जूनमध्ये पावसाळा सुरू झाल्यावर पणजीला समस्यांना सामोरे जावे लागेल, अशी चिंता पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी व्यक्त केली आहे.

पणजीच्या महापौरपदी रोहित मोन्सेरात यांची गुरुवारी पुन्हा निवड झाली. सलग तिसर्‍यांदा त्यांची महापौरपदी निवड झाली आहे. तर उपमहापौरपदी संजीव नाईक यांची दुसऱ्यांदा निवड झाली. कौन्सिल हॉलमध्ये निवडीचा कार्यक्रम झाला. दोघेही बिनविरोध निवडून आले.

Mayor Rohit Monserrate
Pernem Crime: धक्कादायक! नेदरलँडच्या पर्यटक युवतीवर बलात्काराचा प्रयत्न; मोरजी येथील प्रकार

महापौर मोन्सेरात म्हणाले की, शहरातील पायाभूत सुविधांच्या कामांवर निर्णय घेण्याचे अधिकार महापालिकेकडे नाहीत. या पावसाळ्यात पणजीला समस्यांना सामोरे जावे लागेल. सांत इनेजमध्ये काम करणाऱ्या सर्व कंत्राटदारांनी नाले तुंबवले आहेत.

शहरात काम करणाऱ्या सर्व कंत्राटदारांनी आमच्या स्टॉर्म वॉटर ड्रेनचे नुकसान केले आहे. गटारी तुंबल्या आहेत, त्यांनी त्यांचे कामगार वापरून नाले सफाई करावी आणि आम्हाला मदत करावी.

महापौर म्हणाले की, महापालिका साधारणपणे डिसेंबर-जानेवारीमध्ये मान्सूनपूर्व साफसफाईची कामे सुरू करते. परंतु सध्या शहरात सुरू असलेला स्मार्ट सिटी मिशन प्रकल्प आणि जी-20 बैठकीपूर्वी शहराला दिला जाणारा नवा लूक यामुळे मान्सूनपूर्व साफसफाईची कामे हाती घेता आली नाही.

नाले सफाईची जबाबदारी आता पणजीतील प्रकल्प राबविणाऱ्या विविध कंत्राटदारांवर आहे. कंत्राटदारही या कामाला जबाबदार असून आम्ही त्यांच्यावर दबाव आणू. आम्ही शहराचे काळजीवाहू आहोत, परंतु आमच्याकडे काहीही करण्याचा अधिकार नाही.

Mayor Rohit Monserrate
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

महापालिका मार्केटमधील भाडेकरूंच्या भाडेकरारावरून प्रलंबित अडचण दूर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. येत्या आर्थिक वर्षात नॅशनल थिएटरकडे हस्तांतरित केलेली मालमत्ता ताब्यात घेण्याचे पणजी महापालिकेचे उद्दिष्ट आहे, असेही त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com