Theater: दर्जेदार नाट्यनिर्मिती करा!- गोविंद गावडे

विविध संस्थांकडून मंत्र्यांचा गौरव
Theater
TheaterDainik Gomantak

Theater नाट्यसंस्कृती, नाट्यपरंपरा जतन करण्याचे काम गावातील हौशी कलाकारांनी केले आहे आणि करतही आहेत. अशा कलाकारांना व्यासपीठ आणि योग्य तो सन्मान मिळवून देण्यासाठी कला व संस्कृती खाते प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन मंत्री गोविंद गावडे यांनी केले.

पेडणे तालुक्यातील विविध कला व सांस्कृतिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री गावडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. हळर्ण किल्ल्यावर ऐतिहासिक ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकामध्ये गावडे यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका सादर करून वाहवा मिळवली होती.

त्यासंबंधीच्या वृत्तांचे संकलन करून त्याची प्रतिकात्मक भेट गावडे यांना प्रदान करण्यात आली. यावेळी हसापूरचे सरपंच तुळशीदास गावस, नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर, शाहू फुले आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव गवंडी, मोरजी कला निकेतन संस्थेचे अध्यक्ष निवृत्ती शिरोडकर, धारगळचे माजी सरपंच भूषण उर्फ प्रदीप नाईक, पत्रकार मकबूल माळगीमणी, राज्यातील पहिली गोल्ड मेडल ब्लॅक बेल्टधारक सुरेखा कुंकळ्येकर आदी उपस्थित होते.

Theater
Michael Lobo : गोवा पर्यटकांसाठी अतिशय सुरक्षित ठिकाण; पर्यटक आमच्यासाठी देवासमान; मात्र पर्यटकच...

नाटक कोणतेही असो, त्यात समरस होऊन भूमिका सादर करा. सर्वांचे 100 टक्के योगदान मिळाले, तर नाटक दर्जेदार होऊ शकते. हळर्ण किल्ल्यावर ऐतिहासिकस्थळी नाटक करण्याची संधी मिळाली, हा क्षण माझ्यासाठी मोलाचा आहे. अशाच पद्धतीचे नाटक 18 मार्च रोजी मांद्रे मैदानावर होणार आहे. नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

- गोविंद गावडे, कला व संस्कृती मंत्री.

Theater
Smart Panaji: स्मार्ट सिटीच्या कामाचा फटका, दिव्यांग व्यक्ती गाडीसह कलंडला खड्ड्यात

कला क्षेत्रात उंच भरारी घेणारे मंत्री हे कलाकार असल्यामुळे कलाकारांच्या अडचणी ते ओळखू शकतात आणि सोडवूही शकतात. कलाकारांना पाठबळ देण्याचे काम कला व संस्कृती खाते करत आहे. मंत्री गोविंद गावडे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

- तुळशीदास गावस, सरपंच, हसापूर.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com