वेलिंगकरांचा राजकारणातून संन्यास 

dainik gomantak
बुधवार, 8 जुलै 2020

राज्यात तसेच देशात हिंदूंची होणारी गळचेपी व अत्याचार याविरुद्ध लढा देण्यासाठी त्यांची आवश्‍यकता भासल्याने त्यांच्यावरील पक्षाची जबाबदारी मागे घेऊन त्यांना मुक्त करण्यात आले. गोव्यातील छोट्या - मोठ्या हिंदू संघटनांना एका व्यासपीठावर आणून एक बलशाली हिंदू महाआघाडी निर्माण व्हावी, यासाठी त्यांना मुक्त करण्यात आल्याचे कामत यांनी सांगितले. 

पणजी

गोवा सुरक्षा मंच पक्षाचे प्रमुख या पदावरून प्रा. सुभाष वेलिंगकर यांना मुक्त करण्याचा निर्णय ‘भारत माता की जय’ संघटनेने घेतला आहे. हिंदू संघटनांची गोवा राज्यात एक महाआघाडी बनविण्याच्या बिगर राजकीय स्वरुपाच्या कार्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ते संस्थापक संरक्षक या नात्याने संघाच्या राज्य कार्यकारिणीवर कायम निमंत्रित सदस्य असतील, अशी माहिती संघाचे राज्य संरक्षक अवधूत कामत यांनी दिली. 
पणजीत ‘भारत माता की जय’ संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला प्रा. सुभाष वेलिंगकर, सूर्यकांत गावस, प्रा. दत्ता नाईक, प्रा. प्रवीण नेसवणकर हे उपस्थित होते. संघाचे संस्थापक संरक्षक असलेले प्रा. वेलिंगकर यांना २०१८ साली राजकीय क्षेत्रात पर्दापण करण्यास त्यांच्या संरक्षक या जबाबदारीतून संघाने मुक्त केले होते. गोवा सुरक्षा मंच पक्ष स्थापन करून त्याचे ते प्रमुख होते. मात्र, राज्यात तसेच देशात हिंदूंची होणारी गळचेपी व अत्याचार याविरुद्ध लढा देण्यासाठी त्यांची आवश्‍यकता भासल्याने त्यांच्यावरील पक्षाची जबाबदारी मागे घेऊन त्यांना मुक्त करण्यात आले. गोव्यातील छोट्या - मोठ्या हिंदू संघटनांना एका व्यासपीठावर आणून एक बलशाली हिंदू महाआघाडी निर्माण व्हावी, यासाठी त्यांना मुक्त करण्यात आल्याचे कामत यांनी सांगितले. 
यावेळी राजकारणातून निवृत्ती घेतलेल्या प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी सांगितले की, सीएए कायद्याला संसदेने मान्यता दिल्यानंतर सीएए विरोधाचे केवळ निमित्त करून देशभरात मोठ्या प्रमाणात हिंदूविरोधी वातावरण तयार करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्‍व हिंदू परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व अन्य हिंदू संघटनांचे नेते, मंदिरांचे गुरुद्वारांचे पुजारी, हिंदू साधू - संत अशांवर देशभरात पूर्वनियोजन पद्धतीने प्राणघातक हल्ले करण्यात आले, अथवा त्यांची हत्या करण्यात आली. महिलांवर अत्याचार करण्यात आले. अशीच समीकरणे आता गोव्यातही होऊ लागलेली आहेत. काही राजकारणी मुस्लिमांची एकगठ्ठा मतांसाठी त्यांच्या कारवायांकडे दुर्लक्ष करत आहेत. राज्यात तबलिगी व बांगलादेशी सापडले त्याचे पुढे काय झाले? या प्रश्‍न करून वेलिंगकर म्हणाले की, गोव्यात रोहिंग्या व बांगलादेशी सुमारे ६० हजार असल्याचा माझा दावा आहे. विविध नावे घेऊन ते गोव्यात वावरत आहेत. चर्च, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया याना विदेशातून निधी पुरविला जातो. हिंदूंचे संरक्षण करणाऱ्यांना माझा पाठिंबाच असेल ते म्हणाले.  

 
 

संबंधित बातम्या