मडगाव: वेश्या व्यवसाय प्रकरणी दोघांना अटक तर तीन युवतींची सुटका

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 10 एप्रिल 2021

वेश्या व्यवसाय प्रकरणी मडगाव पोलिसांनी आज दुपारी कोंबा रिंग रोड परिसरात कारवाई करून दलाल अरमान खान (29 दवर्ली) व तेजस मराठे (माडेल) या दोघांना अटक केली तर तीन युवतींची सुटका केली.

सासष्टी: वेश्या व्यवसाय प्रकरणी मडगाव पोलिसांनी आज दुपारी कोंबा रिंग रोड परिसरात कारवाई करून दलाल अरमान खान (29 दवर्ली) व तेजस मराठे (माडेल) या दोघांना अटक केली तर तीन युवतींची सुटका केली. पोलिसांनी सदर युवतींची रवानगीमेरशीयेथील अपना घरात केली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी संशयिताविरुद्ध मानवी तस्करी प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मडगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्हीही दलाला आपापल्या दुचाकीवरून तीन मुलींना घेऊन ग्राहकांना सोपविण्यासाठी येणार आहेत, अशी माहिती मिळाली होती. 

त्यानुसार पोलिसांनी त्वरित कारवाई करून दोघांनाही आज दुपारी घटनास्थळी पोचून दोघांना अटक केली व त्यांच्यासोबत असलेल्या 23, 34 व 35 वर्षीय युवतींची सुटका केली. मडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाईत पोलिसाबरोबर बायलांचो एकवट संस्थेच्या आवदा व्हिएगस यांचाही समावेश आहे.

गोवा: राष्ट्रपतींच्या कार्यक्रमातील व्यत्यय भोवला; कंपनीच्या बिलात 5.50 लाखांची कपात
 

संबंधित बातम्या