वेश्या व्यवसायप्रकरणी मसाज पार्लरवर कारवाई; २ दलालांना अटक तर ५ तरुणींची सुटका

UNI
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

कोलवा येथील मसाज पार्लरवर गुन्हा अन्वेषण विभागाच्या क्राईम बँचने छापा टाकून दोघा दलालांना अटक केली, तर पाच तरुणींची वेश्‍या व्यवसायातून सुटका केली. या तरुणींची मेरशी येथील महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. अटक केलेले संशयित ठाणे (मुंबई) येथील असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

पणजी - कोलवा येथील मसाज पार्लरवर गुन्हा अन्वेषण विभागाच्या क्राईम बँचने छापा टाकून दोघा दलालांना अटक केली, तर पाच तरुणींची वेश्‍या व्यवसायातून सुटका केली. या तरुणींची मेरशी येथील महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. अटक केलेले संशयित ठाणे (मुंबई) येथील असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. 

पोलिसांनी अटक केलेल्या दोघा दलालांची नावे सूरज ऊर्फ समरोध शर्मा (३२) व संतोष साधू सोनावणे (३२) अशी आहेत. हे दोघे गोव्यातच कोलवा येथे भाडेपट्टीवर राहत असून मूळचे ते ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील आहेत. त्यांनी मसाज पार्लरमध्ये तरुणींना काम देण्याचे आमिष दाखवून देहविक्री करण्याच्या व्यवसायत गुंतविले होते. या दलालांची गोवा व महाराष्ट्रात आंतराज्य टोळी काम करत असून तरुणींचा पुरवठा करण्याचा काम करतात. ही टोळी दोन्ही राज्यात काम करत असल्याचा संशय असल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 

क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मसाज पार्लरच्या नावाखाली तेथे काम करणाऱ्या तरुणींना देहविक्री करण्यास लावले जाते अशी माहिती मिळाली होती. त्यामुळे या प्रकरणाची माहिती जमा करण्यात आली व बोगस ग्राहक पाठवून ही कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक लक्षी आमोणकर यांनी निरीक्षक सतीश गावडे व इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई केली. या कारवाईत मसाज पार्लरच्या मालकाला चौकशीला बोलावले जाणार आहे. पीडित तरुणींच्या जबान्या बिगर सरकारी संस्थेच्या महिला पदाधिकारी यांच्या उपस्थितीत नोंदवण्यात आल्या आहेत. 

पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना व उपअधीक्षक सुनिता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणाचा तपास निरीक्षक लक्षी आमोणकर करत आहेत. या कारवाईवेळी पथकाने मडगाव पोलिस स्थानकातील दोन महिला गृहरक्षकांची मदत घेतली. क्राईम ब्रँचचे पोलिस कॉन्स्‍टेबल भगवान पालयेकर, संकल्प नाईक यांचाही कारवाईमध्ये सहभाग होता.

Edited By - Prashant Patil

संबंधित बातम्या